Alexa बोलणार आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात, अॅमेझॉनची नवी सेवा लॉन्च
Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज सुरु करण्याचा उद्देश त्यांच्या चाहत्यांना तसेच बॉलिवूडच्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करणे आहे. (Amazon Alexa introduce Amitabh Bachchan's Voice).
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याची चर्चा करायला, संवाद साधायला कुणाला आवडणार नाही? अनेकांची ही इच्छा आता पूर्ण झाली असून अॅमेझॉनने आपल्या अलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज लॉन्च केला आहे. गुगल असिस्टंट आणि सिरी कडे वळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनने ही शक्कल लढवली असून 19 ऑगस्टपासून ही सेवा लॉन्च करण्यात आली आहे.
“Alexa, introduce me to Amit ji”.
— Amazon India News (@AmazonNews_IN) August 19, 2021
Launching @AmazonAlexaIN’s first ever celebrity voice, with none other than @SrBachchan himself.
Listeners can now enjoy jokes, poems, motivational quotes, stories & more in his signature baritone voice 🎶
Read more 👉🏼 https://t.co/lQg2XZpGQg pic.twitter.com/50uMJkQ7Mw
अमिताभ बच्चन यांचा आवाज Alexa वर कसा सुरु करायचा?
अॅमेझॉनने आपली बहुचर्चित सेवा असलेल्या Alexa वर अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला लॉन्च केलं आहे. वापरकर्त्यांना हा आवाज सुरु करायचा असेल तर त्यांना 149 रुपये इन्ट्रोडक्टकरी किंमत भरावी लागेल. त्यानंतर वापरकर्त्यांना ही सुविधा एक वर्षापर्यंत अनुभवता येईल.
Alexa वर आपल्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज सुरु करायचा असेल तर आपल्या आवाजात “Alexa, introduce me to Amitabh Bachchan” असं म्हणावं लागेल. या व्यतिरिक्त आपल्याला थेट अॅमेझॉनच्या साईटवरुनही ही सुविधा खरेदी करता येईल. पेमेंट केल्यानंतर आपल्याला Alexa वरुन अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळेल.
T 4003 - Another day .. another beginning .. another connect .. with you .. now on #Alexa .. ask and ye shall hear .. !! 🙏@AmazonAlexaIN @amazonIN pic.twitter.com/oSk488Muz6
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 19, 2021
ही सुविधा सुरु करताना आपल्याला “Amit ji” हा वेकअप की वर्ड वापरावा लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या आवाजात “Alexa, enable Amit ji wake word” असं म्हणावं लागेल. त्यानंतर Alexa बाय डिफॉल्ट काम करेल.
गेल्या वर्षी अॅमेझॉनने Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज आणणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा उद्देश अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना तसेच बॉलिवूडच्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा होता.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाच पर्दाफाश, टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठी नाव पुढे येण्याची शक्यता
- 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी' प्रकरण: सोनी पिक्चर्सला हायकोर्टाकडून तीन आठवड्यांचा अंतरिम दिलासा
- TikTok Star: कारखान्यात काम करणारा 21 वर्षांचा मुलगा युरोपचा सर्वात मोठा टिकटॉक स्टार कसा झाला? 10 कोटींहून अधिक फॉलोअर्स