एक्स्प्लोर
जगातील हायेस्ट पेड टॉप 10 अभिनेत्यांमध्ये अक्षय-सलमान
'फोर्ब्स' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील हायेस्ट पेड टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत अक्षयकुमार सातव्या, तर सलमान खान नवव्या क्रमांकावर आहे.
मुंबई : जगात सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार आणि सलमान खान यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. 'फोर्ब्स' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत अक्षय सातव्या, तर सलमान नवव्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचा या यादीत समावेश नाही.
वर्षभरात 283 कोटी रुपयांची कमाई करणारा अक्षय कुमार 'फोर्ब्स'च्या जगातील हायेस्ट पेड अभिनेत्यांच्या यादीत सातव्या स्थानी आहे. 269 कोटी रुपये कमवणारा सलमान या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. एक जून 2017 ते एक जून 2018 या कालावधीतील ही आकडेवारी आहे.
अक्षय आणि सलमान यांच्या चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सलमानचे ट्यूबलाईट, टायगर जिंदा है, रेस 3 यासारखे सिनेमे या काळात रीलीज झाले, तर अक्षयचे टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन हे चित्रपट प्रदर्शित झाले.
हॉलिवूडमधील प्रख्यात कलाकार जॉर्ज क्लूनी या यादीत अव्वल आहेत. त्यांची कमाई 239 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 1675 कोटी रुपये आहे. 35 वर्षांची अभिनय कारकीर्द असलेल्या क्लूनी यांच्या नावे टकिला कंपनीही आहे.
या यादीत ड्वेन 'द रॉक' जॉनसन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर जॅकी चॅन पाचव्या आणि विल स्मिथ सहाव्या क्रमांकावर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement