एक्स्प्लोर
Advertisement
बॉलिवुडचा खिलाडी सोडणार कॅनडाचे नागरिकत्व; हे आहे कारण
बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॅनडाचे नागरिकत्व त्याने का स्वीकारलं याचा गौप्यस्फोट त्याने एका कार्यक्रमात केला आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नागरिकत्वाच्या मुद्यावरुन अनेकवेळा टिकेचा धनी झाला आहे. अक्षय कुमारने सात वर्षांपूर्वी कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारलं? याचा गौप्यस्फोट दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. त्याशिवाय, आता पुन्हा भारताचा नागरिक होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यासाठी त्याने भारताच्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.
कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्याविषयी अक्षय म्हणतो, "बॉलिवुडमध्ये माझे सलग 14 चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे आपली कारकीर्द आता धोक्यात आली असून जगण्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली. त्यात माझ्या कॅनडातील मित्राने कॅनडात दोघे मिळून व्यवसाय करु, असा सल्ला दिला. त्यामुळे मी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले. मात्र, सुदैवाने माझा पंधरावा चित्रपट चालल्याने माझ्यावरचे संकट टळले". त्यानंतर पासपोर्ट बदलण्याबाबत विचार केला नसल्याचे अक्षयने सांगितले.
माझ्या कॅनडाचे नागरिकत्वावरुन नेहमीच माझ्या देशभक्तीवर संशय व्यक्त केला जातो. त्यामुळेच मी भारतीय नागरिकत्व पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे अक्षयने सांगितले. दरम्यान, मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट दाखण्याची वेळ येते ही गोष्टी खेदजनक असल्याचे अक्षय म्हणाला. मतदान करण्यावरुन झाला होता ट्रोल - 2019 ला देशात घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अक्षय कुमारने मतदान केले नाही. यावरुन सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल झाला. त्यावर अक्षय कुमारने "मी सात वर्षांपूर्वीच कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलं" असल्याची कबुली ट्विटरवरुन दिली होती. दरम्यान, अक्षयचा जन्म भारतात झाला असला तरी अधिकृतरित्या तो भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडा देशाचे नागरिकत्व आहे. भारतीय नियमाप्रमाणे दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्याची परवानगी नाही. संबंधित बातम्या- 'पानिपत'साठी असे तयार झाले 'सदाशिव राव' आणि 'अहमद शाह अब्दाली' 'पा' चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण; अभिषेक बच्चनची भावूक पोस्ट Housefull 4 | अक्षय, रितेश, बॉबी, क्रिती, पूजा, क्रितीचा रेल्वेप्रवास | Mumbai | ABP MajhaNeither Left nor Right. Right at the Centre. Thank you @akshaykumar ???? @ABPNews Aapko Rakhen Aage.
अक्षय कुमार: मेरी और ट्विंकल की विचारधारा इतनी अलग है कि डिनर पर एक दिन Republic TV चलता था तो अगले दिन NDTV। लेकिन अब इतनी अंडरस्टैंडिंग हो गई है कि अब ABP News देखते हैं। pic.twitter.com/kw6US7iwAr — Pinky Rajpurohit (ABP News) ???????? (@Madrassan_Pinky) December 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement