एक्स्प्लोर
Advertisement
'पा' चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण; अभिषेक बच्चनची भावूक पोस्ट
'पा' चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक आर. बाल्की हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यानिमित्ताने अभिषेक बच्चनने एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई : दिग्दर्शक आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'पा' ला आज दहा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन भावूक झाले आहेत. या चित्रपटाची कथा ऑरो नावाच्या 12 वर्षांच्या मुलाची आहे. हा मुलगा प्रोजरिया नावाच्या एका दुर्लभ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असतो. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ऑरो हे पात्र साकारलं असून अभिषेक बच्चनने आरोच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. यामध्ये ऑरोच्या आईची भूमिका अभइनेत्री विद्या बालनने केली आहे.
अभिषेकने इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिलं आहे की, ' 'पा' चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. हा पहिला चित्रपट होता, जो मी प्रोड्यूस केला होता. दूरदर्शी आर.बाल्की यांच्या विश्वासाशिवाय चित्रपट पूर्ण करणं शक्य नव्हतं. अनेक लोकांना हे माहित नाही की, मला या चित्रपटात काम करायचं नव्हतं. (कारण मी माझ्या भूमिकेबाबत साशंक होतो), बाल्की आणि मी एकत्र जाहिरातीचं शुटिंग करत होतो, त्यावेळी त्यांनी संपूर्ण दिवस माझी समजूत काढण्यात घालवला.' अभिषेक पुढे बोलताना म्हणाला की, 'तासन्तास त्यांनी मला समजावलं आणि फार त्रास दिला, त्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी मी हो म्हणालो. पण हा अनुभव मजेशीर आणि आठवणीत राहिल असाच होता. मला या गोष्टीचा आनंद आहे की, त्यांनी या प्रवासात मला जे काही मार्गदर्शन केलं त्या उपकारांती परतफेड मी कधीच करू शकणार नाही आणि त्यांना धन्यवादही देऊ शकणार नाही. मला या चित्रपटावर फार गर्व आहे.'
दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन सध्या आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी आपला एक क्लासी फोटो शेअर करत आपल्या फॅन्सला सांगितले की, ते मनालीमध्ये असून क्लायमॅक्स शुटिंग करत असल्याचे सांगितले. बिग बींसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्टही उपस्थित आहेत. अमिताभ बच्चान यांनी शेअर केलेल्या फोटोवर त्यांची मुलगी श्वेता नंदा हिने एका स्माइलीसोबत 'डॅडी कूल' अशी कमेंट केली आहे. संबंधित बातम्या : रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत 'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीजT 3567 - ..minus degrees ..err like -3 .. protective gear .. and the work etiquette .. pic.twitter.com/EdB3maKZpA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement