एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
मुंबई : 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'रुस्तम' चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला गौरवण्यात आलं आहे.
प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित रुस्तम या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही ऑफिसर रुस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. आपल्या अनुपस्थितीत पत्नीला एका पुरुषाने भुलवल्यानंतर 'रुस्तम'ने त्याची केलेली हत्या आणि त्याची देशभक्ती या विषयावर चित्रपटाची कथा आधारित आहे. रुस्तममध्ये अक्षयसोबत एलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते.
गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारचे हॉलिडे, बेबी, स्पेशल 26, एअरलिफ्ट यासारखे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. सुरुवातीच्या काळात अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला खिलाडी कुमार नंतर चरित्र भूमिकाही साकारताना दिसला. अक्षय कुमारचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगही प्रचंड असून त्याचे अनेक सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये गेले आहेत.
26 वर्षांच्या कारकीर्दीत फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, आयफा सारखे लोकप्रिय पुरस्कार पटकावणाऱ्या अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी हुलकावणी दिली. 2011 मध्ये त्याचा 'पद्मश्री'ने गौरव करण्यात आला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
दरम्यान, अक्षयकुमारने या सन्मानाविषयी सर्वांचे आभार मानले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/akshaykumar/status/850255320295145472
अभिनेत्री सोनम कपूरला 'नीरजा' चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या घोषणांनंतर सोनमने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरची दोघांची पहिली प्रतिक्रिया या फोटोत दिसते
National Film Awards : 'कासव'ने पुरस्कारांची शर्यत जिंकली
यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला. कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत, अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं.- सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय कुमार (रुस्तम)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
- आधारित पटकथा – दशक्रिया
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
- सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – शिवाय
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- नीरजा
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
- स्पेशल मेन्शन – अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)
- फिल्म फ्रेण्डली राज्याचा पुरस्कार उत्तर प्रदेशला
- सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement