एक्स्प्लोर
अक्षय कुमार साकारणार 'पृथ्वीराज चौहान'
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही मात्र अक्षयने पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी होकार दिला आहे.
मुंबई : तराइनच्या युद्धात मोहम्मद घोरीला लोळवणाऱ्या पराक्रमी पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट साकारला जातोय. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही मात्र अक्षयने पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी होकार दिला असल्याची माहिती मिळत आहे.
पुढल्या वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असून या वर्षअखेरपर्यंत शुटिंगला सुरूवात होणार असल्याचे बोलले जात आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'केसरी' सिनेमानंतर अक्षयचा हा दुसरा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट असेल.
पृथ्वीराज चौहान यांचा जन्म वर्ष ११६६ साली झाला होता. अजमेरचे महाराजा सोमेश्वर चौहान हे त्यांचे वडील. पृथ्वीराज चौहान यांना दिल्लीचे अखेरचे हिंदू राजा असंही म्हटले जाते. ११९१ साली झालेल्या तराइन युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला होता.
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेन्ड सुरु आहे. त्यामध्ये 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. कंगना राणावतचा मणिकर्णिका नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर थुमाकूळ घालतोय. यासोबत अजून काही ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील या ऐतिहासिक चित्रपटात त्यांच्या पत्नी संयोगिता, पृथ्वीराजांचा शत्रू मोहम्मद घोरी, गयासुद्दीन गजनी, राजा जयचंद यांच्याही प्रमुख व्यक्तीरेखा असतील. या सर्व भूमिका कोण करणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
आगामी काळात प्रदर्शित होणारे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे चित्रपट
अजय देनवगनचा 'तानाजी : दी अनसंग वॉरियर'
संजय दत्त, अर्जून कपूरचा 'पानिपत'
करण जोहरचा 'तख्त'
वरुण धवनचा 'कलंक'
अक्षय कुमारचा 'केसरी'
अर्जून रामपालचा 'मुघल रोड'
अक्षय कुमारचे अपकमिंक चित्रपट
केसरी
मिशन मंगल
गुड न्यूज
सूर्यवंशी
हाऊसफुल्ल 4
क्रॅक
रावडी राठोड 2
हेरा फेरी 3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement