एक्स्प्लोर
अक्षयच्या बर्थडेला सेहवागचं 'ऑलराउंडर' ट्वीट
मुंबई: भारतीय क्रिकेटचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या मैदानाबाहेरही कशा प्रकारे ट्वीटचे षटकार लगावतो? हे सर्वांनाच माहित आहे. 140 शब्द मर्यादा असलेल्या ट्विटरच्या मैदानात सेहवाग दिग्गजांनाही ट्रॉल करत असतो. बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्तही त्याने हटके ट्वीट केले आहे.
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने आज 49 व्या वर्षात पदार्पण केले. त्याच्या बॉलिवूडमधील व्यक्तीरेखेला साजेसे ट्वीट विरेंद्र सेहवागने करून शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये अक्षयला ऑलराउंडर म्हटलं आहे. तो म्हणतो की, ''अक्षय बॉलिवूडचा सर्वोत्तम ऑलराउंडर आहे. त्याच्याकडे अॅक्शनही आहे, कॉमेडीही आहे, ड्रामा आणि खेळही आहे.''
सेहवागने या पूर्वीही आपल्या हटके स्टाईलमध्ये ट्वीट करून दिग्गजांना ट्रॉल केले आहे. त्याच्या ट्वीटचे क्रिकेटपटूंपासून ते राजकीय नेते मंडळी लक्ष्य बनले आहेत. आजपर्यंत त्याने बराक ओबामा, शोएब अख्तर, हरभजन सिंह यांना आपल्या हटके स्टाईलमध्ये ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत. संबंधित बातम्या#HappyBirthdayAkshayKumar The best all-rounder in Bollywood-Action bhi,Comedy bhi,drama bhi.Khel jaao@akshaykumar pic.twitter.com/0t5dzABvh2
— Virender Sehwag (@virendersehwag) September 9, 2016
स्ट्रगलर ते बॉलिवूडचा खिलाडी!
अक्षय कुमारच्या आयुष्यातील 10 रंजक गोष्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement