एक्स्प्लोर
'या' दिवशी प्रदर्शित होणार अजय देवगणचा 'तानाजी : दी अनसंग वॉरियर'
"आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं" असं म्हणत छत्रपती शिवरायांच्या एका शब्दावर कोंढाणा जिंकणारा स्वराज्याचा मावळा तानाजी मालुसरे यांचा बायोपिक येतोय.
मुंबई : "आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं" असं म्हणत छत्रपती शिवरायांच्या एका शब्दावर कोंढाणा जिंकणारा स्वराज्याचा मावळा तानाजी मालुसरे यांचा बायोपिक येतोय. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण या बायोपिकमध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. स्वतः अजय देवगण आणि सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे.
हा चित्रपट 27 डिसेंबर 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीमने जाहीर केले होते. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले आहे.
या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह याची व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ओम राऊत यांनी याआधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा बायोपिक लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार, याबाबत सर्वांनाच उस्तुकता आहे. अभिनेता सलमान खान ही भूमिका करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परंतु त्याला चित्रपटाच्या टीमने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
Start the 2020 new year with me, as Tanhaji releases on Jan 10.
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 24, 2019
Ajay Devgn’s #Tanhaji: #TheUnsungWarrior gets a new release date: 10 Jan 2020... Directed by Om Raut... Produced by Ajay Devgn’s ADFL and Bhushan Kumar’s TSeries. #TanhajiTheUnsungWarrior pic.twitter.com/WE7aSGa6FQ
— taran adarsh (@taran_adarsh) March 24, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement