Bholaa : मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार अजय देवगण आणि तब्बूची जोडी, लवकरच प्रदर्शित होणार 'भोला'
Ajay Devgn : अजय देवगणचा आगामी 'भोला' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bholaa : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी 'भोला' (Bholaa) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अजय देवगणने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'भोला' सिनेमा 30 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'भोला' सिनेमात अजय देवगण तब्बूसोबत दिसणार आहे. 'भोला' हा तामिळ 'कैथी' सिनेमाचा रिमेक आहे. लवकरच अजय देवगण 'भोला' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. या सिनेमात थरार नाट्य दाखवण्यात येणार आहे. तर सिनेमात तब्बू एका दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
अजय देवगण आणि तब्बूची जोडी याआधी 'दे दे प्यार दे' या सिनेमात दिसली होती. 'भोला' सिनेमाचे दिग्दर्शन धर्मेंद्र भोला करत आहेत. अजय देवगणचा 'मैदान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणच्या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या