एक्स्प्लोर
...तर संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल : सरकार
व्हीआयपी स्टेटसमुळे नियमांचं उल्लंघन करुन अभिनेता संजय दत्तला पॅरोल मिळाला असेल, तर त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागेल, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.
मुंबई : व्हीआयपी स्टेटसमुळे नियमांचं उल्लंघन करुन अभिनेता संजय दत्तला पॅरोल मिळाला असेल, तर त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागेल, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.
पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच संजय दत्तला तुरुंगातून का सोडलं, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात दिला होता.
चांगल्या वर्तणुकीमुळे 57 वर्षीय संजय दत्तची आठ महिन्यांआधीच जेलमधून सुटका केली. संजय दत्तला लागू झालेला चांगल्या वर्तणुकीचा निकष स्पष्ट करावा, असं न्यायाधीशांनी आज राज्य सरकारला सांगितलं आहे.
संजय दत्त अनेक वेळा फर्लो आणि पॅरोलवर बाहेर होता. 100 पेक्षा जास्त दिवस तो जेलबाहेर असल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. संजयला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची टीकाही वारंवार झाली होती.
संजय दत्तचं वर्तन चांगलं होतं, हे अधिकाऱ्यांनी कसं ठरवंल? अर्ध्यापेक्षा जास्त वेळ संजय दत्त पॅरोलवर बाहेर असताना त्यांना हे ठरवायला वेळ कसा मिळाला? असे प्रश्न मुंबई हायकोर्टाने मागील महिन्यात विचारले होते.
संजय दत्तला पॅरोल आणि फर्लो देताना नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यास सरकारला काहीच हरकत नसेल, असं राज्य सरकारच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलं.
1993 मुंबई साखळी स्फोटात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मे, 2013 मध्ये संजय दत्तला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती.
यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. परंतु त्याने 18 महिने तुरुंगात घालवले होते.
संबंधित बातम्या
संजय दत्त काही स्वातंत्र्यसैनिक होऊ शकत नाही: उज्ज्वल निकम
सुटकेचा मार्ग सोपा नव्हता : संजय दत्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement