83 Premiere: 83 चा भव्य प्रीमियर; रणवीर सिंह आणि कपिल देव यांनी होस्ट केला कार्यक्रम
रणवीर सिंहचा (Ranveer Singh) '83' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
83 Premiere: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) '83' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या (24 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे. 83 चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच मुंबईमधील एका मल्टीप्लेक्समध्ये पार पडला. रणवीर सिंह आणि क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांनी या प्रीमियर शोचे सूत्रसंचालन केले. या प्रीमियर शोला 1983 वर्ल्ड कपच्या संपूर्ण टीमने आणि 83 या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल देव, रणवीर सिंह यांनी एकत्र प्रीमियर शोच्या रेड कार्पेटवर वॉक केला.
1983 वर्ल्ड कपची संपूर्ण टीम होती प्रीमियर शोला उपस्थित
संदीप पाटिल, कृष्णामचारी श्रीकांत, मदनलाल, बलविंदर संधू, दिलीप वेंगसरकर, सुनील वाल्सन, सैय्यद किरमानी, कीर्ति आजाद, रोजर बिन्नी, रवी शास्त्री, सुनील गावस्कर आणि मोहिंदर अमरनाथ या सर्वांनी या प्रीमियर शोला हजेरी लावली होती. 1983 वर्ल्ड कपच्या वेळी टीमचे मॅनेजर असणारे पीआर मान सिंह हे देखील त्यांच्या पत्नीसोबत या शोला उपस्थित होते.
जाह्नवी कपूर, करण जौहर, रोहित शेट्टी, वाणी कपूर, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, नोरा फतेही, विवेक ओबेरॉय आणि शरवरी वाघ या कलाकारांनी देखील 83 च्या प्रीमियर शोला हजेरी लावली.
View this post on Instagram
83 चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्माती आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
हे ही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha