एक्स्प्लोर

800 Trailer: मुथय्या मुरलीधरनचे आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर; 800 चा ट्रेलर रिलीज, स्लमडॉग मिलेनियर फेम मधुर मित्तल प्रमुख भूमिकेत

800  Trailer: 800 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील मधुर मित्तलच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत.

800 Trailer: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनचे (Muttiah Muralitharan)  आयुष्य रुपेरी पडद्यावर  उलगडणार आहे. लवकरच त्याचा 800 नावाचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 800 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये मुरलीधरनच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, तसेच त्याला क्रिकेट खेळताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, या गोष्टींची झलक दाखण्यात आली आहे.

800 या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की, मुरलीधरनच्या भूमिकेत असलेला अभिनेता मधुर मित्तल हा बॉलिंग करत आहे. त्यानंतर मुरलीधरनच्या बालपणाची झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती मुरलीधरनला बेस्ट बॉलर असं म्हणतो. 800 या चित्रपटाचा ट्रेलर तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे.

800 या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मधुर मित्तलच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. भारत, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये  800 या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. 800 या चित्रपटामध्ये मुथय्या मुरलीधरनची भूमिका आधी अभिनेता विजय सेतूपती साकारणार होता, असं म्हटलं जात आहे. 

एम.एस. श्रीपती यांनी 800 या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. क्रिकेटपटू मुरलीधरन हा यशस्वी गोलंदाज कसा बनला, हे 800 या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दाखवले जाणार आहे.

800 या चित्रपटामधील अभिनेता मधुर मित्तलनं  'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात सलीम ही भूमिका साकारली होती. आता त्याच्या 800 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मधुर मित्तलनं मिलियन डॉलर आर्म,कहीं प्यार ना हो जाये या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 800 हा चित्रपट  तमिळ, हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Muthiah Muralidaran (@murali_800)

 तरण आदर्श यांनी 800 चित्रपटाचा एक खास व्हिडीओ  ट्वीटवर शेअर केला होता. मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स आणि विवेक रंगाचारी यांनी 800 या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

800 Trailer: '800' चा ट्रेलर सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार लाँच; मुंबईमध्ये पार पडणार ट्रेलर लाँच कार्यक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget