Abhishek Banerjees Statement On Bollywood Casting Couch: सिनेमातील रोलच्या बदल्यात 'हमबिस्तर' होणं सामान्य, बॉलिवूडमधील काळं सत्य अभिषेक बॅनर्जींनी रोखठोक मांडलं
Abhishek Banerjees Statement On Bollywood Casting Couch: बॉलिवूडमध्ये पूर्वी शारीरिक संबंधांची मागणी करणं ही एक सामान्य गोष्ट होती, जी मीटू चळवळीनंतर बदलली, असं खळबळजनक वक्तव्य अभिषेक बॅनर्जीनं केलं आहे.

Abhishek Banerjees Statement On Bollywood Casting Couch: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) आणि तिची काळी बाजू आपल्या सर्वांनाच परिचयाची झालीय. आजवर अनेक स्टार्सनी (Bollywood Celebrity) याबाबत उघडपणे सांगितलं आहे. अशातच आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता (Bollywood Actor) अभिषेक बॅनर्जीनं (Abhishek Banerjee) आपलं मन मोकळं केलं आहे. अभिनेत्यानं बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव उघडपणे सांगितलं आहे.
बॉलिवूडमध्ये पूर्वी शारीरिक संबंधांची मागणी करणं ही एक सामान्य गोष्ट होती, जी मीटू चळवळीनंतर बदलली, असं खळबळजनक वक्तव्य अभिषेक बॅनर्जीनं केलं आहे. 'स्त्री' फेम अभिनेत्याची एक कास्टिंग कंपनी आहे. त्याबाबत बोलताना अभिनेत्यानं सांगितलं की, त्याची कंपनी नेहमीच प्रतिभेला प्राधान्य देते आणि कोणताही कर्मचारी या चुकीच्या ट्रेंडचा भाग बनू नये, याची खात्री करते, तसेच काळजीसुद्धा घेते.
अभिषेक बॅनर्जीनं मिड-डेशी बोलताना सांगितलं की, मीटू चळवळीनंतर कॉफी शॉप मीटिंग्ज आणि डिनर मीटिंग्जमध्ये घट झाली आहे. तो म्हणाला की, हा एक मोठा बदल आहे. अभिनेत्यानं सांगितलं की, जेव्हा तो त्याच्या महिला सहकाऱ्यांशी बोलतो, तेव्हा त्याला जाणवतं की, आता त्या अधिक समजूतदार झाल्या आहेत आणि आता मुलं भोळी राहिलेली नाहीत.
View this post on Instagram
अभिनेत्यानं स्वतःच्या कास्टिंग कंपनीसाठी बनवले कठोर नियम
कास्टिंगच्या बहाण्यानं कॉफी शॉप आणि डिनर मीटिंग्ज आयोजित केल्या जात होत्या, जे का केलं जायचं, हे अजुनही अभिषेक बॅनर्जी कधीच समजू शकलेला नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या कास्टिंग कंपनीमध्ये एक अतिशय कडक नियम होता की, कोणीही ऑफिसबाहेर अभिनेत्याला भेटू शकत नाही. जर कोणी ऑफिसबाहेर भेटत असेल तर तो कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्या व्यक्तीला भेटणार नाही. जर अभिनेत्याला याबाबत कळलं की, कोणीतरी कॉफी शॉपमध्ये कास्टिंगसाठी एखाद्या अभिनेत्याला भेटलंय, तर त्यांना थेट कामावरून काढून टाकलं जाईल, असे सक्त नियम अभिनेत्यानं बनवले आहेत.
अभिषेक बॅनर्जीनं बोलताना सांगितलं की, "शारीरिक संबंधांची मागणी इतकी सामान्य होती की, जेव्हा लोकांना त्याच्या कंपनीच्या कठोर नियमांबद्दल आणि कामाच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीबद्दल कळलं, तेव्हा अनेकांना धक्का बसला." अभिनेत्यानं पुढे बोलताना सांगितलं की, इतर कास्टिंग ऑफिसमध्ये 'फ्लर्टिंग' सामान्य असलं तरी, त्यानं खात्री केली की, त्याची कंपनी अशा कामांमध्ये सहभागी होणार नाही. जेव्हा अभिषेक कास्टिंग करायचा, तेव्हा लोकांना विश्वास ठेवणं खूप कठीण झालेलं की, तो कोणत्याही शारीरिक मागणीशिवाय कास्टिंग करतोय. तो म्हणाला की, काम करताना तो फक्त कामच करत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























