आधी सागर करंडेशी भांडली, आता बिग बॉसच्या घरात तन्वी कोलते ढसाढसा रडली; मग सागरही नरमला, नेमकं काय घडलं?
या टास्कमध्ये तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार वाद झाला आणि याच वादानंतर घरात एक अत्यंत भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सुरू होताच घरातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. पहिल्या काही दिवसांतच सदस्यांमध्ये मतभेद, वाद आणि रणनीती आखण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान घरात मोठी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या टास्कमध्ये तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार वाद झाला आणि याच वादानंतर घरात एक अत्यंत भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.
नॉमिनेशन टास्कमध्ये उफाळले वाद
नॉमिनेशन टास्कदरम्यान दोघांमध्ये झालेली चर्चा हळूहळू वादात रूपांतरित झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं. मागील काही भागांपासून तन्वी आणि सागर यांच्यात किरकोळ खटके उडताना दिसत होते, मात्र यावेळी हा वाद अधिक तीव्र झाल्याचं प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
भावनांचा बांध फुटला
वादानंतर तन्वी कोलते अचानक भावूक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ती ढसाढसा रडताना दिसली. इतकं रडणं तिला सावरता येणं कठीण झालं होतं. हा प्रसंग पाहून घरातील इतर सदस्यही अस्वस्थ झाले. मतभेद बाजूला ठेवत अनेक सदस्यांनी तन्वीला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तिचं सांत्वन केलं.
सागर कारंडेची प्रतिक्रिया
या संपूर्ण घटनेनंतर सागर कारंडेही नरमावलेला दिसला. “बिचारी… मला खरंच वाईट वाटतं तिचं. ती जर एकदा माझ्याकडे येऊन सगळं सांगितलं असतं, तर मी तिला पूर्णपणे हलकं केलं असतं,” असं तो म्हणताना प्रोमोमध्ये दिसतो. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे दोघांमधील वाद पुढे कसा वळण घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
हा भावनिक क्षण तन्वी आणि सागरच्या नात्यात बदल घडवणार की वाद अधिकच वाढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. घरातील समीकरणं दिवसेंदिवस बदलत असताना पुढील भागांत कोणते नवे ट्विस्ट पाहायला मिळतील, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6, दररोज रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर.






















