Bigg Boss 19: फॅमिली वीकनंतर बिग बॉसच्या घरात डबल एविक्शनची टांगती तलवार!; दोन स्पर्धक फिनालेच्या रेसमधून बाहेर?
बिग बॉस 19 च्या फॅमिली वीकनंतर प्रेक्षकांना धक्कादायक डबल एविक्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Bigg Boss 19: बिग बॉस 19 मधील हा आठवडा फॅमिली वीकचा होता. स्पर्धकांच्या कुटुंबीयांच्या एन्ट्रीमुळे बिग बॉसच्या (Bigg Boss 19) घरातील वातावरण भावनिक झाले होते. भावनिक क्षणांबरोबर या आडवड्यात कॉमेडीचा तडकाही पाहायला मिळाला. कुटुंबीयांच्या येण्याने स्पर्धकही रिचार्ज झाल्यासारखे जाणवले. मात्र, वीकेंडला झालेल्या डबल एविक्शनमुळे दोन स्पर्धकांचे फिनालेमध्ये जाण्याचे स्वप्न तुटले आहे. काही मीडिया वृत्तांनुसार, कुनिका सदानंद आणि मालती चाहर या आठवड्यात शोमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे फॅन्सलाही धक्का बसलाय. काही चाहत्यांना कुनिका सदानंदचे एविक्शन करणं हा निर्णय चुकीचा आहे असं वाटतंय. तर काही जण मालती चाहरच्या एविक्शनला सपोर्ट करताना दिसत आहेत. या दोघी बाहेर गेल्या तर आता शोमध्ये प्रणीत मोरे, अमाल मलिक, गौरव खन्ना, अशनूर कौर, तान्या मित्तल, फरहाना भट्ट आणि शहबाज बदेशा हे स्पर्धक उरतील.
मालती चाहरच्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित केल्याने वाद
काही एपिसोडमध्ये मालती चाहर आणि कुनिका सदानंद यांच्यात खूप वाद झाले. एका एपिसोडमध्ये तान्या मित्तलशी बोलताना कुनिका सदानंद यांनी मालती चाहरच्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे वीकेंड का वारमध्ये रोहित शेट्टी यांनी दोघींनाही फटकारल्याचं दिसलं. सोशल मीडियावरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
कुनिकाने केली होती वैयक्तिक आयुष्यावरून चर्चा
कुनिका सदानंदने शोमध्ये नेहमीच आपली मते बेधडकपणे मांडली. त्या फरहाना भट्टसोबत बोलताना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांची माहिती दिली. त्यांनी आपल्या मुलाच्या कस्टडीसाठी तब्बल 9 वर्षे लढा दिल्याचे सांगितले. कुनिका मुंबईतील काम सोडून अनेकदा दिल्लीच्या न्यायालयात जात असत. तसेच त्या वर्षानुवर्षे एका व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही तिने सांगितलं होतं.
मालती चाहरला सपोर्ट करण्यासाठी भावाची एंट्री
बिग बॉस हाऊसमध्ये मालती चाहरची एंट्री वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून झाली होती. फॅमिली वीकमध्ये तिला सपोर्ट करण्यासाठी तिचा भाऊ आणि क्रिकेटर दीपक चाहर घरात आला होता, आणि त्यांची एंट्री सध्या चर्चेत आहे.























