Amitabh Bachchan : 'आता कुठेतरी थांबायला हवं', ब्लॉगवर येणाऱ्या कमेंट्समुळे बिग बी झाले हताश
अमिताभ बच्चन यांनी आपलं काम करता करता ब्लॉग लिहिणंही सुरू केलं. अगदी न चुकता रोज अमिताभ बच्चन छोटा-मोठा ब्लॉग लिहित होते. पण आता त्यांना या ब्लॉगपासून ब्रेक घ्यावासा वाटू लागलं आहे.

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी रसिक मनाचा अनेक वर्षांपासून ठाव घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी काहीही केलं तरी त्यावर रसिक प्रेक्षक उड्या घेत असतात. त्यांच्या सिनेमांनी तर वेड लावलंच. शिवाय, कौन बनेगा करोडपतीवरही लोकांनी अमाप प्रेम केलं. म्हणूनच त्याचे इतके सीझन झाले. बच्चन यांनी आपलं काम करता करता ब्लॉग लिहिणंही सुरू केलं. अगदी न चुकता रोज अमिताभ बच्चन छोटा-मोठा ब्लॉग लिहित होते. पण आता त्यांना या ब्लॉगपासून ब्रेक घ्यावासा वाटू लागलं आहे.
अमिताभ बच्चन यांनीच आपल्या नव्या ब्लॉगमध्ये ही बाब बोलून दाखवली आहे. एकतर आपण लिहिणं थांबवावं किंवा अदृश्य होऊन जावं असं वाटतं असं बच्चन म्हणतात. बच्चन यांच्या ब्लॉगवरही लोकांच्या उड्या पडल्या आहेत. या ब्लॉगला जवळपास एक हजार कमेंट्स आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवर येणाऱ्या कमेंटसनी बच्चन व्यथित झाले होते. अगदी तुम्ही कधी मरणार इथपासून अलिकडे बच्चन यांना सोशल मिडियावर तुम्ही किती मदत देताहात असे अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातून बच्चन यांना या प्रकाराचा उबग आला असावा असं बोललं जातं.
अमिताभ यांच्या ब्लॉगला येणाऱ्या प्रतिसादाबद्दलही जागरुक आहेत. आधी जेव्हा अमिताभ यांनी ब्लॉग सुरू केला तेव्हा, अमिताभ बच्चन यांच्या एका ब्लॉगवर किमान 10 हजार कमेंट्स यायच्या. पण आता तो आकडा हजारावर आला आहे. आपल्या फॅन्सचा हा प्रतिसाद पाहून अमिताभ बच्चन यांना आता आपण लिहिणं थांबवावं वाटतं. आपण हा ब्लॉग आपण कधी थांबवू ते मात्र त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही.























