Ashok Kadam : तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन; 25 वर्षे केलं लता मंगेशकरांसोबत काम
सुप्रसिद्ध तबला-ढोलकी वादक अशोक कदम (Ashok Kadam) यांचे 56 वर्षी निधन झाले.
Ashok Kadam : गान कोकिळा अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न स्व. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यासोबत तब्बल 25 वर्षे काम करणारे कल्याण मधील सुप्रसिद्ध तबला-ढोलकी वादक अशोक कदम (Ashok Kadam) यांचे 56 वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने काल रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आदित्य - ओंकार ही दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच कल्याणकर नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या तबला आणि ढोलकी वादनाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कल्याणातील अशोक कदम यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने काल रात्री निधन झाले आहे. अशोक कदम यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. मूळचे शहापूर येथील असणारे कदम कुटुंबियांमध्ये मुळातच संगीत क्षेत्राची गोडी.
वडीलांपासून हा कलेचा वारसा अशोक आणि त्यांचे बंधू स्व. मनोहर यांच्यामध्ये उतरला होता. स्व. मनोहर कदम हे उत्तम सनईवादक म्हणून परिचित होते. तर अशोक कदम यांनी तबला, ढोलकी, पखवाज वाजवत. त्याच्या कौशल्यामुळेच भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यासोबत अशोक कदम यांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 25 वर्षे काम केले. देश - परदेशात झालेल्या लता दिदिंच्या असंख्य सोहळ्यात अशोक कदम यांनी तबला वादन केले होते. संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरपर्यंत जपला.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन; वयाच्या 82 व्या घेतला अखेरचा श्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha