Anurag Kashyap :: 'मी या व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल करत आहे'; अनुराग कश्यपनं केली पोस्ट
अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
Anurag Kashyap : अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांना तसेच वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. अनुरागच्या सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजने लोकांची विशेष पसंती मिळवली. या सीरिजमधील डायलॉग्स तसेच कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, सेक्रेड गेम्स या वेब सीरिजच्या कास्टिंगला सुरूवात झाली आहे. अनुरागने ही पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करून ही अफवा असल्याचं सांगितलं आहे.
अनुरागनं सेक्रेड गेम्स सिझन-3 च्या व्हायरल झालेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. हा स्क्रिन शॉट शेअर करून त्यानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'हा व्यक्ती स्कॅमर आहे. प्लिज राजबीर_कास्टिंग या पेजला रिपोर्ट करा. मी याच्या विरोधात FIR दाखल करत आहे. सेक्रेड गेम्स सिझन-3 या वेब सीरिजचं कास्टिंग तसेच शूटिंग होणार नाही. '
View this post on Instagram
सेक्रेड गेम्स ही एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सीरिज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज गायवान यांनी दिग्दर्शित केली होती. या सीरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.