Amreen Bhat : जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या; उमर अब्दुल्ला यांच्याकडून शोक व्यक्त
दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीन भट यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला.
Amreen Bhat : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची (Amreen Bhat) हत्या केली आहे. काल (25 मे) संध्याकाळी दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीन भट यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला. यामध्ये अमरीन यांना अनेक गोळ्या लागल्या. या हल्ल्यामध्ये अमरीन यांचा दहा वर्षांचा भाचा देखील जखमी झाला. अमरीन यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी अमरीन यांच्या हत्येबाबत शोक व्यक्त केला आहे. 'अमरीन भट यांच्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने धक्का बसला आणि खूप दुःख झाले. दुर्दैवाने अमरीन यांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला त्यांचा भाचा देखील जखमी झाला आहे.' असं ट्वीट उमर अब्दुल्ला यांनी शेअर केलं आहे.
35 वर्षीय अमरीन या त्यांच्या गाण्याचे आणि अभिनयाचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत होत्या. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत होती.
Shocked & deeply saddened by the murderous militant attack on Ambreen Bhat. Sadly Ambreen lost her life in the attack & her nephew was injured. There can be no justification for attacking innocent women & children like this. May Allah grant her place in Jannat. pic.twitter.com/5I9SsymbD0
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 25, 2022
अमरीन यांच्या व्हिडिओंना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. अमरीनच्या हत्येनंतर त्यांचे चाहते संतप्त आणि दु:खी आहेत. अमरीन यांचे चाहते सोशल मीडियावर गुन्हेगारांना लवकर पकडण्याची मागणी करत आहेत.
संबंधित बातम्या