एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 22 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 22 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ

बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह फोटोशूटसाठी चक्क न्यूड (Nude Photoshoot) झालाय. रणवीर सिंहच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोंमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिली आहे. पेपर मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. प्रत्येक फोटोंमध्ये रणवीर सिंहचा लूक कॉन्फिडेंट, बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. रणवीर सिंहच्या फोटोशूटचं काहींनी कौतुक केलेय तर काहींनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलेय. याआधी अभिनेता मिलिंद सोमन यानेही न्यूड फोटोशूट केले होते.  'Ranveer Singh: the Last Bollywood Superstar ' या मथळ्याखाली पेपर मॅगझीनने रणवीर सिंह बद्दल माहिती आणि फोटो पोस्ट केले आहेत. 

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा डंका; अदितीनं पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री अदिती विनायक द्रविड (Aditi Vinayak Dravid) हिनं बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार पटकावला आहे. अदितीला IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटामधील अभिनयासाठी बर्लिन इंडिया फिल्म फेस्टिव्हलचा (Berlin Indie Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटाचे दिग्दर्शन पियुष कुलकर्णी यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अदितीनं अस्मी ही भूमिका साकारली आहे. पुण्याच्या अदिती द्रविडनं आता बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कर पटकावून मराठी चित्रपटसृष्टीची मान अभिमानानं उंचावली आहे.

Raj Thackeray, Asha Bhosle : 'ग्रेट-भेट!' राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले शिवतीर्थावर

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर लीलावती रुग्णालयात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सध्या राज ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मंगळवारी (19 जुलै) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आशा भोसले या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचल्या होत्या.

Mi Punha Yein Trailer : उलगडणार बंडखोरांचं रहस्य; 'मी पुन्हा येईन'चा ट्रेलर रिलीज

प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 29 जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे (Sayaji shinde), उपेंद्र लिमये (Upendra Limaye), सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav), रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी आहे. राजकारणातील नाटकाभोवती फिरणाऱ्या या  कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे.

De Dhakka 2 Trailer : 'काय झाडी, काय हाटेल, ओक्केमध्ये एकदम...'; ‘दे धक्का 2’चा भन्नाट ट्रेलर रिलीज

2008 मध्ये दिग्दर्शित झालेला‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. आता 14 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. दे धक्का-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंब हे लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहे. ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.

14:08 PM (IST)  •  22 Jul 2022

यशच्या निमित्ताने अरुंधती-अनिरुद्धमध्ये पुन्हा आपुलकी निर्माण होणार?

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या पुन्हा एकदा भरारी घेत आहे. मालिकेत सध्याचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक ठरत आहे. कथानकातील ट्विस्टनंतर आता मालिका टीआरपी शर्यतीत देखील बाजी मारत आहे. मालिकेत सध्या यशवर खोट्या खुनाचा आरोप लागल्याचा ट्रॅक सुरु होता. याच निमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंब जवळ आलं आहे. यातच आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढताना पुन्हा एकदा अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात आपुलकी निर्माण झाली आहे.

वाचा संपूर्ण बातमी

13:21 PM (IST)  •  22 Jul 2022

महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’साठी मराठी अभिनेत्रीने लिहिलं गाणं!

De Dhakk 2 : नुकताच बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘दे धक्का 2’चा (De Dhakka 2) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक पोट धरून खळखळून हसले आहेत. यंदा या चित्रपटातून जाधवांची स्वारी थेट लंडनच्या राणीच्या घरी जाणार आहे. ‘दे धक्का 2’ हा चित्रपट सगळ्याच अर्थांनी खास असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका मराठी अभिनेत्रीचं गीत लेखन क्षेत्रात पदार्पण झालं आहे. मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) हिने आगामी ‘दे धक्का’ या चित्रपटासाठी गीतलेखन केलं आहे.

वाचा संपूर्ण बातमी

11:54 AM (IST)  •  22 Jul 2022

JugJugg Jeeyo On OTT : नीतू कपूर-अनिल कपूर यांचा ‘जुगजुग जियो’ ओटीटीवर!

JugJugg Jeeyo On OTT : बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा बहुप्रतीक्षित ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पुन्हा पदार्पण केल्याने, त्यांच्या निर्णयाचे खूप कौतुक झाले. ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार असून, तो प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

10:10 AM (IST)  •  22 Jul 2022

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होणार! पुरस्कारांसाठी ‘या’ चित्रपटांची नावे चर्चेत

68th National Film Awards : माहिती आणि प्रसारण मंत्रालय शुक्रवारी (22 जुलै) 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा करणार आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात. आज दुपारी 4 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. 68वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी

09:16 AM (IST)  •  22 Jul 2022

Koffee With Karan 7 : '... म्हणून मी ट्विंकलच्या पाया पडतो'; कॉफी विथ करणमध्ये अक्षयनं केला गौप्यस्फोट

Koffee With Karan 7 : करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो कॉफी विथ करण 7  (Koffee With Karan 7) च्या आगामी एपिसोडचा प्रीमियर रिलीज करण्यात आला आहे. कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि साऊथ चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी हजेरी लावली. करणने या दोन सेलिब्रिटींसोबत खूप मस्ती केली. सामंथा आणि अक्षय दोघांनीही त्यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. 

वाचा सविस्तर बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget