एक्स्प्लोर

Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल

Navneet Rana: राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांतच होणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून आपल्या मतदारसंघात निवडणुकांची तयारी करत आहेत.

Navneet Rana: अमरावती : भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवि राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख पत्रात असून नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आलीय. तसेच, राणा दाम्पत्याच्या अमरावतील येथील घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे. तर, पत्रात पाकिस्तान जिंदाबाद, असाही उल्लेख आहे. याबाबत, रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी शहरातील राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, या पत्रामुळे व पोलिस तक्रार दाखल झाल्याने अमरावती (Amravati) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी हिंदू शेरणी म्हणून स्वत:ची ओळख पुढे केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी हैदराबादला जाऊन भाजपच्या प्रचारार्थ भाषणंही केले होते. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांतच होणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून आपल्या मतदारसंघात निवडणुकांची तयारी करत आहेत. नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आता विधानसभेला त्या मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने नवनीत राणा यांचाही प्रचार सुरू आहे. मात्र, एकीकडे निवडणुकांसाठीची तयारी सुरू असतानाच त्यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

नवनीत राणा यांना पाठविण्यात आलेल्या धमकी पत्राद्वारे संबंधित व्यक्तीने राणा दाम्पत्याकडे 10 करोड रूपयाच्या खंडणीची मागणी केली असून खंडणी दिली तरच पिच्छा सोडणार असल्याचा उल्लेख पत्रात आहे. या पत्रात नवनीत राणा यांचे पति रवी राणा यांच्या विषयी वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला असून मी हैदराबादचा आहे, असेही त्याने सांगितले. तसेच, मी कोणत्याही पार्टीचा नाही. माझा भाऊ वसिम ह्याने दुबईतून तुम्हाला कॉल केला होता. मात्र, तुम्ही तो फोन उचलला नाही, असे म्हणत संबंधिताने या पत्रात दुबाईतील भावाचा फोन नबंरही उल्लेख केला आहे. दरम्यान, हे पत्र संबंधित आमिर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीच्या हाताने लिहिले असल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. याप्रकरणी, रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेही वाचा 

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार? कोण फुंकणार विधानसभेचं रणशिंग?Zero Hour Guest Centre Manoj Jarange | घरी बसून चालणार नाही, सगळ्यांनी एकजुटींनी नारायणगडावर या!पुण्यातील बोपदेव घाटातील बलात्काराची A to Z कहाणी ABP MajhaRohit Pawar On Nitesh Rane | नितेश राणेंना दीड महिन्यानंतर कोण वाचवणार याचा विचार करावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget