एक्स्प्लोर

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, 2029 मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. 2029 मध्ये साधना वहिनीच (गिरीश महाजन यांच्या पत्नी) निवडणूक लढणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा साधना महाजन यांना जास्त मतं मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. जामनेर येथे आयोजित शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं साधना महाजन घेऊ शकतात

या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. मात्र 2029 मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेवू शकतात असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जामनेरमध्ये आयोजित शिवसृष्टी व भिमसृष्टी स्मारकाच्या अनावरण प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचा पगार बंद होणार नाही

महिलांना एसटीमध्ये अर्ध तिकीट सवलत दिल्यापासून एसटी बस नफ्यात आली असल्याचे महाजन म्हणाले. कारण एसटीमध्ये महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं एसटी बसेस या पूर्ण क्षमतेनं भरल्या आहेत.  या योजनेमुळे महामंडळ नफ्यात आलं आहे. एवढ्या लोकप्रिय योजना देणारे सरकार हे राज्यात पहिल्यांदा आल्याचे महाजन म्हणाले. त्यांनी 50 50 वर्ष राज्य केलं ते आता भोंगे पसरवत आहेत तुम्ही तर काही केलं नाही मग आज तुम्ही का ओरडता? असा सवाल महाजन  यांनी उपस्थित केला. आमची तिजोरी खाली झाली पगार कुठून देणार ते आम्ही पाहू. पगार देण्याचं काम आमचं आहे तुमचं नाही. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचा पगार बंद होणार नाही असेही महाजन म्हणाले.  यावेळी आम्ही 1500 रुपये देतोय पुढच्यावेळी आम्ही तीन हजार रुपये करु असंही ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले व ठाकरे गट वाले छाती ठोकून ओरडताय रडताय की आता आमचं काय होईल. त्यांना आता माहिती आहे की कोणतीच बहीण आपल्याला मदत करणार नाही, कारण हेच काँग्रेस वाले महिलांच्या योजने विरोधात कोर्टात गेली आहे. त्यामुळं त्यांना आता रात्रीची झोप येत नाही असे महाजन म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम; शाळा-महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या 75 वर्षांचा उत्सव

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget