Koffee With Karan 7 : '... म्हणून मी ट्विंकलच्या पाया पडतो'; कॉफी विथ करणमध्ये अक्षयनं केला गौप्यस्फोट
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि साऊथ चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी कॉफी विथ करण 7 (Koffee With Karan 7) मध्ये हजेरी लावली.
Koffee With Karan 7 : करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो कॉफी विथ करण 7 (Koffee With Karan 7) च्या आगामी एपिसोडचा प्रीमियर रिलीज करण्यात आला आहे. कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि साऊथ चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी हजेरी लावली. करणने या दोन सेलिब्रिटींसोबत खूप मस्ती केली. सामंथा आणि अक्षय दोघांनीही त्यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.
करणने कॉफी विथ करण 7 मध्ये अक्षयला पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल विचारले. करणने विचारले की, तो ट्विंकलच्या कामाला आणि करिअरला कसा सपोर्ट करतो का? या प्रश्नाचं उत्तर अक्षयनं दिलं. तसेच ट्विंकलबाबत अक्षयनं कॉफी विथ करण 7 या कार्यक्रमामध्ये एक गौप्यस्फोट केला आहे.
ट्विंकल आधी बॉलिवूडमधील अभिनेत्री होती आणि आता इंडस्ट्रीला अलविदा करून ट्विंकल कादंबरीकार बनली आहे. ट्विंकल ही प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते. जेव्हा करणने कॉफी विथ करण 7 मध्ये अक्षयला ट्विंकलबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं, 'जेव्हा ट्विंकल काही तरी लिहिते तेव्हा मी तिच्या पाया पडून तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मी तिला सांगतो की, मर्यादा ओलांडू नको. मी तिला दोन ते तीन तास समजावतो.'
जेव्हा करण म्हणाला की, 'ट्विंकल तिला हवं तेच करते.' यावर अक्षय म्हणतो, 'मी तिनं लिहिलेलं वाचतो आणि ते एडिट करतो. पण हात जोडून आणि भीक मागून.' कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये सारा अली खान, जाह्नवी कपूर, रणवीर सिंह आणि आलिया भट्ट या कलाकरांनी हजेरी लावली.
हेही वाचा: