(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samrat Prithviraj : अमित शाहांकडून 'सम्राट पृथ्वीराज'चं कौतुक; सिनेमा पाहिल्यानंतर पत्नीला म्हणाले, 'चलिए हुकुम'
अमित शाह (Amit Shah) यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Samrat Prithviraj : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी (1 एप्रिल) अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट पाहिला. यावेळी अमित शाह यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. अमित शाह यांनी चित्रपट पहिल्यानंतर या सिनेमाचं कौतुक केलं. तसेच चित्रपट पाहिल्यानंतर अमित शाह हे चाणक्य सिनेमा हॉलच्या बाहेर जात असताना पत्नी सोनल शाह यांना 'चलिए हुकुम' असं म्हणाले.
कुटुंबातील सदस्य, काही केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे उच्च अधिकारी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह यांनी सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर, या चित्रपटाच्या कथेचे कौतुक करताना गृहमंत्री म्हणाले की, 'प्रतिष्ठेच्या चौकटीत महिलांचे स्वातंत्र्य काय असू शकते, त्यांच्याबाबत आदर काय असू शकतो, सन्मानाचा अधिकार हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. सांस्कृतिक उंची या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.'
#WATCH This film depicts Indian culture of respecting women & empowering women. A cultural awakening started in India in 2014, and it will again take India to the heights it was once at : Union Home Minister Amit Shah at a special screening of the film Samrat Prithviraj in Delhi pic.twitter.com/TmKZZDHYoa
— ANI (@ANI) June 1, 2022
अमित शाह यांनी पुढे सांगितले, 'सम्राट पृथ्वीराज ही एका अशा योद्ध्याची कहानी आहे जे अफगाणिस्तानपासून दिल्लीपर्यंतच्या एक- एक इंच जमिन मिळवण्यासाठी लढले. 900-1000 वर्षांची ही लढाई व्यर्थ गेली नाही. 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 2014 मध्ये भारतामध्ये सांस्कृतिक पुनर्जागरणाचे काम सुरू करण्यात आलं. ' यावेळी अमित शाह यांच्यासोबतच पियूष गोयल, अनुराग ठाकुर आणि अश्विनी वैष्णव हे देखील उपस्थित होते. 3 जून रोजी पृथ्वीराज हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबतच मानुषी छिल्लर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. मानुषी छिल्लरने संयोगिता ही भूमिका साकारली आहे. संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा या कलाकारांनी सिनेमात महत्तवाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा :
- Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेत नवा ट्विस्ट; कॉलेज रियुनियन ठरणार निर्णायक
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Hemangi Kavi : 90s मधल्या लोकांना कळेल... आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक गेला; केकेच्या मृत्यूनंतर हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल