(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hemangi Kavi : 90s मधल्या लोकांना कळेल... आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक गेला; केकेच्या मृत्यूनंतर हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल
Hemangi Kavi : हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्श्वगायक केके यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. हेमांगीने मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. हेमांगी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची मतं मांडत असते. आता पुन्हा एकदा हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्श्वगायक केके यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
केके यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. केके यांच्या निधनाने चाहत्यांसह सेलिब्रिटींनादेखील मोठा धक्का बसला आहे. आता अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील सोशल मीडिया पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
हेमांगी कवीची पोस्ट काय आहे?
हेमांगी कवीने केके यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला! शाळा संपून कॉलेजमधल्या नवनवीन हवेत 'यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल' या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. 90 च्या दशकातील लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, टाइम ट्रवलसारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!"
View this post on Instagram
बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी केके यांनी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
संबंधित बातम्या