Yuvika Chaudhary : जातिवाचक वक्तव्य अभिनेत्री युविका चौधरीला भोवलं; पोलिसांकडून अटक
अनुसूचित जातींबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप युविकावर करण्यात आला आहे.
हिसार: क्रिकेटर युवराज सिंहनंतर आता जातिवाचक वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री युविका चौधरीला अटक करण्यात आली. पण काही वेळ झालेल्या चौकशीनंतर तिला जामीन मिळाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी युविका चौधरीची 3 तास चौकशी केली. त्यानंतर युविकाला जामीन देण्यात आला. अभिनेत्री युविका चौधरी स्प्लिट्स व्हिला आणि बिग बॉस विजेता प्रिन्स नरूलाची पत्नी आहे.
युविकावर असा आरोप आहे की, तिने अनुसूचित जातींबाबत अपमानजनक वक्तव्य केल आहे. हे वक्तव्य युविकाने मे महिन्यामध्ये केले होते. त्यावेळी तिच्या जातिवाचक वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. काही लोकांनी अभिनेत्रीच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत तिच्याविरोधात हांसी पोलीस स्टेशनमध्ये निषेध दर्शवला. युविकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तक्रारदारांनी हा व्हिडीओ पोलिसांना दाखवला, त्या व्हायरल व्हिडीओच्या आधारे युविकाविरोधात एफआयआर नोंदवला होता.
रजत कलसन यांची युविका चौधरीच्या विरोधात तक्रार
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, अभिनेत्री युविका चौधरी पोलीस तपासासाठी गेली होती. त्यावेळी युविकाचा पती प्रिन्स नरूला देखील तिच्यासोबत होता. युविकाच्या विरोधात दलित हक्क कार्यकर्ता रजत कलसन यांनी तक्रार दाखल केली. रजत कलसन यांनी युवराज सिंह आणि तारख मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्री मुनमुन दत्ता यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली होती.
बिग बॉस 9 मुळे युविका आली चर्चेत
युविका चौधरी बिग बॉस 9 या शोमुळे चर्चेत आली. याच शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस सिझन 9 मध्ये युविका प्रिन्स नरूला या अभिनेत्याला भेटली. त्यादोघांच्या या शोमधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. युविका प्रिन्स सोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
Kangana Ranaut च्या 'धाकड'ची रिलीज डेट जाहिर; कंगानाच्या लूकची जोरदार चर्चा