आर. माधवन अन् दिया मिर्झाची केमिस्ट्री असलेल्या 'Rehna Hai Tere Dil Mein' ची 20 वर्ष; चित्रपटाचे हटके किस्से
'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता.
Rehna Hai Tere Dil Mein 20 Years: अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि आर माधवन (R Madhwan) यांच्या 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 वर्ष झाली आहेत. या चित्रपटामध्ये एका जोडप्याची निरागस लव्ह स्टोरी पाहायला मिळते. 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जास्त कामाई केली नाही परंतू चित्रपटातील गाणी आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट चर्चेत होता. जाणून घेऊयात 'रेहना है तेरे दिल में' चित्रपाटबद्दल काही खास गोष्टी
'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाचे नाव आधी 'कोई मिल गया' असे ठेवण्यात आले होते. पण नंतर नाव बदलण्यात आले. तसेच या चित्रपटामध्ये दिया मिर्झाच्या ऐवजी अभिनेत्री रिचा पलोदला प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आले होते. पण त्यानंतर दिया मिर्झाने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचा काही भाग हा मुंबईमध्ये तर काही साउथ अफ्रीकेमध्ये शूट करण्यात आला आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट Minnale चा रिमेक आहे. या चित्रपटातील दोन गाणी ही या तमिळ चित्रपटामधीलच घेण्यात आली आहे. वासु भगनानी यांनी 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाची निर्मिती केली होती.
Kangana Ranaut च्या 'धाकड'ची रिलीज डेट जाहिर; कंगानाच्या लूकची जोरदार चर्चा
सिक्वेल प्रदर्शित होण्याची शक्यता
लवकरच 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे अशी चर्चा होत आहे. एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये क्रिती सेनन आणि विक्की कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'रहना है तेरे दिल में' च्या सिक्वेलचे शूटिंग 2022 मध्ये सुरू होईल.