एक्स्प्लोर

#BreakUpAnthemOfTheYear : प्रेमाच्या आठवड्यात ब्रेकअप रॅप साँगची चर्चा,  रुचिरा जाधवच्या 'चांगली खेळलीस तू’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

Marathi Breakup Song : मयंक पुष्पम सिंह निर्मित आणि विनय प्रतापराव देशमुख दिग्दर्शित ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप आहे. या गाण्यात अभिनेता विनय प्रतापराव देशमुख आणि ग्लॅमरस अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) यांची जोडी दिसणार आहे.  

Ruchira Jadhav New Song : “तिच्या सोबतीने केला आयुष्यातील सुंदर क्षणांचा प्रवास आणि तिच्याविना तळमळत राहिलो त्या क्षणांच्या आठवणीत... अशीच काहीशी गत होते ज्यांचं ब्रेकअप होतं. ती नसली म्हणून आयुष्यच थांबलं का? तिच्या शिवाय आयुष्यात रस उरला नाही का? ‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’,‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने प्रेमाच्या महिन्यात #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मयंक पुष्पम सिंह निर्मित आणि विनय प्रतापराव देशमुख दिग्दर्शित ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप आहे. या गाण्यात अभिनेता विनय प्रतापराव देशमुख आणि ग्लॅमरस अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) यांची जोडी दिसणार आहे.  रुचिराने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रुचिराने साकारलेली ‘माया’ची भूमिका लोकप्रिय ठरली. आता या गाण्याच्या माध्यमातून रुचिरा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय, त्यामुळे तिला पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग नक्कीच उत्सुक असणार यात शंका नाही. या गाण्याच्या निमित्ताने रुचिरा, विनय देशमुखसोबत स्क्रिन शेअर करतेय. 

विनयने देखील मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, कंटेट क्रिएटर म्हणून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या ‘एव्हीके एंटरटेनमेंटने (AVK Entertainment)’ कंपनीने पहिला मराठी सेलिब्रिटी अकापेला सादर केला होता, ज्यामध्ये 66 मराठी कलाकार, 43 मराठीतील गाजलेली गाणी आणि सोबतीला संवाद होते. या गाण्याची संकल्पना विनय प्रतापराव देशमुख यांची होती आणि त्यांनीच या अकापेला व्हिडीयोचे दिग्दर्शन केले होते. मराठी ब्रेकअप रॅप साँग आणि नवीन जोडी लवकरच प्रेक्षकांना अनुभवायाला मिळणार आहे. 

‘चांगली खेळलीस तू’ या गाण्याच्या शिर्षकावरुन गाण्याचा विषय नेमका काय आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. पण म्युझिक, गाण्याचे बोल, कलाकारांच्या भूमिकेची झलक, एकंदरीत गाण्याचाही अंदाज आता आला असावा कारण नुकताच या ब्रेकअप रॅपचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. 

सध्याच्या तरुण पिढीला रॅप साँगचे फार क्रेझ... मराठीतही रॅप साँग आहेत ज्याच्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे आणि आता प्रेक्षकांसाठीच ब्रेकअप रॅप साँग येतंय ‘चांगली खेळलीस तू’. हे गाणं रॅपर सर्जा याने गायले असून, या गाण्याचे बोल ही त्यानेच लिहिले आहेत. शांप्रद भम्रे यांनी गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. सुमेध कंकाळ हे गाण्याचे असोशिएट प्रोड्युसर आहेत, तर निखिल गुल्हाने हे डिओपी आहेत. “प्रेम कधी होतं की ते कधी नव्हतंच, त्या प्रेमाच्या भावनांचं काय ज्या कायम ख-या होत्या?” ब्रेकअप दरम्यान एखाद्याच्या मनात नेमके काय विचार येतात ते ‘चांगली खेळलीस तू’ या गाण्याच्या माध्यमातून दिसणार आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Twinkle Khanna Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड
तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड
Manjeet Kaurs Old Interview: 'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं
'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं
Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'
बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Kaas Flower Festival : कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज,मंडपघळसह नवे पॉइंट्स विकसित
कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
Embed widget