Naagin 6 : 'नागिन 6'मध्ये तेजस्वी प्रकाश साकारणार 'ही' भूमिका, तेजस्वीने शेअर केला व्हिडीओ
Naagin 6 : नागिनमध्ये 'बिग बॉस 15' विजेती तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत आहे.
Tejasswi Prakash : 'बिग बॉस 15' विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) लवकरच 'नागिन 6' (Naagin 6) मध्ये दिसणार आहे. 12 फेब्रुवारी 2022 पासून हा शो सुरू होणार आहे. या शोमध्ये तेजस्वी प्रकाश व्यतिरिक्त बिग बॉसचे माजी स्पर्धक सिंबा नागपाल आणि मेहक चहल देखील दिसणार आहेत.
तेजस्वीने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत तेजस्वीने लिहिले आहे,"तुम्ही माझ्या सर्वच पात्रांवर प्रेम केले आहे. तसेच प्रेम माझ्या आगामी पात्रावरदेखील करा. 'नागिन'मध्ये मी 'प्रथा' हे पात्र साकारणार आहे".
'नागिन 6' ची कथा विषाणूपासून संरक्षण करणे, अशी आहे. व्हायरसपासून देशाला वाचवण्याचे काम नागिन हाती घेणार आहे. आतापर्यंत नागिन तिच्या प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी लढली आहे. पण या भागात नागिन देशासाठी लढताना दिसणार आहे.
View this post on Instagram
'या' मालिकेत तेजस्वी प्रकाशने काम केले
'2612' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. 'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.
संबंधित बातम्या
Amol Palekar : अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रुग्णालयात दाखल
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
Gehraiyaan Song : दीपिका पदुकोणच्या 'गेहरांईया' सिनेमातील 'बेकाबू' गाणे रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha