Kajal Aggarwal, Samantha : बॉडी शेमिंग करणाऱ्यांना काजलचं सडेतोड उत्तर; समंथा म्हणाली...
Kajal Aggarwal : काजलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडोतोड उत्तर दिले आहे.
Kajal Aggarwal : प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) लवकरच आई होणार आहे. ती सध्या तिच्या पतीसोबत म्हणजेच गौतम किचलू (Gautam Kitchlu) सोबत दुबईमध्ये आहे. दुबईमध्ये एन्जोय करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर करत बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडोतोड उत्तर दिले आहे. तसेच तिच्या या पोस्टवर अभिनेत्री समंथानं (Samantha) देखील कमेंट केली आहे.
काजलची पोस्ट
काजलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती व्हईट शॉर्ट ड्रेस, पिंक कलरचा शर्ट आणि व्हईट हॅट अशा लूकमध्ये दिसत आहे. कॅप्शनमध्ये काजलनं लिहिले, 'माझ्या आयुष्यात सध्या वेगवेगळे बदल होत आहेत. ते शारीरीक, घरामधील आणि कामामध्ये होणारे बदल आहेत. अशा वेळी बॉडी शेमिंग आणि मीम्स तयार करणाऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. प्रेग्नन्सी दरम्यान आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. वजन देखील वाढते. ' या पोस्टमध्ये काजलनं प्रेग्नंट महिलांचे बदल समजून न घेणाऱ्या लोकांना मूर्ख म्हणलं आहे.
समंथाची कमेंट
काजलनं केलेल्या पोस्टवर समंथानं कमेंट केली, 'तू आताही सुंदर आहेस आणि नेहमीच सुंदर राहशील’
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Naagin 6 : 'नागिन 6'मध्ये तेजस्वी प्रकाश साकारणार 'ही' भूमिका, तेजस्वीने शेअर केला व्हिडीओ
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha