अभिनेते खासदार मनोज तिवारींना कन्यारत्न, मुलीच्या जन्मानंतर म्हणाले 'जय जगदंब'
उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. मनोज तिवारी यांनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. सोबतच त्यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
नवी दिल्ली: उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. मनोज तिवारी यांनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. सोबतच त्यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटोही शेअर केला आहे. कन्यारत्न प्राप्तीनंतर मनोज तिवारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. मनोज तिवारी यांना आणखी एक मुलगी आहे जी मुंबईत शिक्षण घेत आहे.
मनोज तिवारी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझ्या घरी एक परी आली आहे. I am blessed with a baby girl... जय जगदंबे.. '' याच ट्वीटसोबत त्यांनी मुलीला घेतलेला एक फोटो देखील शेअर केला आहे.
मेरे घर आयी एक नन्ही परी... I am blessed with a baby girl... जय जगदंबे.. 🙏🙏 pic.twitter.com/JYarVvRf4X
— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) December 30, 2020
मनोज तिवारी यांचं अभिनंदन करताना दिल्ली भाजप सचिव इम्प्रीत सिंह बख्शी यांनी लिहिलं आहे की, ''लक्ष्मीजींच्या आगमनाच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप शुभेच्छा''
सध्या मनोज तिवारी यांनी कृषी कायद्याच्या समर्थनात मोहिम चालवली आहे. त्यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या संदर्भात चर्चेसाठी आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. मनोज तिवारी यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही बनले.