'मी आधीच गौरीशी लग्न..' आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? गौरीसोबतच्या नात्याबाबत नेमकं काय म्हणाला?
Aamir Khan Talks About Gauri Spratt and third marriage: आमिर खान आणि गौरी स्प्राट गंभीर नात्यात असल्याची कबुली. तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर आमिर खानने प्रतिक्रिया दिली.

Aamir Khan Talks About Gauri Spratt and third marriage: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट बऱ्याचदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. कधी विधानांमुळे तर कधी तो वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात असतो. आमिर खान या आधी दोन लग्नावरून चर्चेत आला आहे. मात्र, तो पुन्हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे. आमिर खान आणि गौरी स्प्राट यांचे नाते सर्वज्ञात आहे. ते दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या या नात्याबाबत माहिती आहे. अलिकडेच त्याने एका मुलाखतीत, गौरीसोबत असलेल्या नात्याबद्दल खूप गंभीर असून, कमिटेड असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.
मुलाखतीत गौरीच्या नात्याबाबत आमिर खान नेमकं काय म्हणाला?
बॉलिवूड हंगामला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, "गौरीसोबत असलेल्या नात्यात मी खूप गंभीर आहे. आम्ही दोघेही एकमेकांशी कमिटेड आहोत. आम्ही वाईट आणि चांगल्या परिस्थितीत एकमेकांची साथ देतो. खरं सांगायचं झाल्यास मी माझ्या मनातून गौरीशी लग्न केलं आहे. पुढे जाऊन आम्ही लग्न करू किंवा नाही, हे मला काही ठाऊक नाही.. परंतु, हे सत्य आहे. याबाबत मी फ्यूचरमध्ये नक्कीच निर्णय घेईन", असं आमिर खानने स्पष्ट केलं.
'गेल्या 25 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत'
View this post on Instagram
"आम्ही अनपेक्षितपणे भेटलो, नंतर संपर्कात राहिलो, पुढे सर्व काही घडत गेलं", असंही आमिर खान म्हणाला. गेल्या वर्षी आपल्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यानं गौरीशी ओळख प्रसारमाध्यमांशी करून दिली होती. तेव्हा त्यानं, गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं स्पष्ट केलं. गौरी एका 6 वर्षांच्या मुलाची आई आहे. तिला बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा जोडीदार हवा होता, तिला हे गुण आमिर खानमध्ये आढळून आल्याचं तिनं स्पष्ट केलं. गौरी आता आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. दोघांचेही सध्या एकत्रित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, दोघेही एकमेकांशी विवाह करणार का? हा प्रश्न सध्या नेटकरी उपस्थित करत आहेत.
























