एक्स्प्लोर

Aabhalmaya : 'जडतो तो जीव...', आठवणींच्या सूरांनी कलाकारांच्या डोळ्यात अश्रू; प्रिया बापटने 'झी मराठी'च्या मंचावर गायलं आभाळमायाचं शीर्षकगीत

Aabhalmaya : अभिनेत्री प्रिया बापट हिने झी मराठी अॅवॉर्ड्सच्या सोहळ्यात आभाळमायाचं शीर्षकगीत गायलं.

Aabhalmaya : मराठीमधली पहिली दैनंदिन मालिका 'आभाळमाया' ला (Aabhalmaya ) नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. मालिकेची आशयघन कथा, दिग्गज कलाकार मंडळी आणि साधी सरळ मांडणी या सगळ्यामुळे ही मालिका अजरामर झाली. मराठी सिनेसृष्टीत असा एकही कलाकार नसावा जो या मालिकेचा भाग नाही, असं कायम म्हटलं जातं. या मालिकेच्या शीर्षकगातीपासून सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना आजही भावतात. नुकत्याच पार पडलेल्या 'झी मराठी अॅवॉर्ड्सच्या' सोहळ्यातही या मालिकेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 

मालिकेतील सगळ्या कलाकारांनी यावेळी झी मराठी अॅवॉर्ड्सच्या मंचावर हजेरी लावली. इतकच नव्हे तर अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या आवाजात आभाळमायाचं शीर्षकगीतही गायलं. त्यामुळे झी मराठीच्याच मंचावर पुन्हा एकदा एका अजरामर मालिकेचे सूर छेडले गेले. अनेकांच्या डोळ्यात यावेळी अश्रूही पाहायला मिळाले. 

प्रियाने गायलं आभाळमायचं शीर्षकगीत

प्रिया बापट हिनेही आभाळमाया या मालिकेत अगदी छोटी भूमिका साकारली होती. त्या मालिकेपासून प्रियाच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली, असं प्रियाने अनेकदा सांगितलं आहे. इतकच नव्हे तर याच मालिकेच्या सेटवर तिची आणि अभिनेता उमेश कामतची भेट झाली आणि त्यांना आयुष्यभराचे सूर गवसले. त्याच मालिकेचं शीर्षकगीत गाताना उमेशही मंचावर हजर होता.  

मुग्धा गोडबोलेंनी दिला आभाळमायाच्या आठवणींना उजाळा

मुग्धा गोडबोले यांनी नुकतच आभाळमायासाठी पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटलं की,  आभाळमाया नं काय दिलं.. तर ओळख, अभिमानाने सांगावी अशी एक कायमस्वरुपी आठवण, पुढे अनेक कामं, एक सुसंस्कृत मित्रमंडळ आणि ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणावं अश्या एका मालिकेचा भाग असण्याचे भाग्य. आता गणितं बदलली आहेत त्यामुळे आता अश्या मालिका का होत नाहीत असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आता व्यवसाय, अर्थकारण आणि प्रेक्षक सुद्धा बदलले आहेत. पण ह्या गंगेत पावन झालेले आम्ही अजूनही ह्या आठवणीत खूप खूप रमतो. तेव्हा ना टीआरपी होता ना लेखक दिग्दर्शकांवर इतकी बंधनं. पण काहीतरी नक्की होतं ज्यामुळे 25 वर्षानंतरही केवळ त्या एका नावासाठी आम्ही सगळे एकत्र येतो. ती एक बातमी होते. ते काय हे शोधून काढायला हवं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Aabhalmaya : 'अभिमानाने सांगावी अशी एक कायमस्वरुपी आठवण...', 'आभाळमाये'ची 25 वर्ष; अभिनेत्रीची खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Aamir khan and gauri spratt wedding: 100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
OTT Crime Thriler: OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 
OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 
Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
Embed widget