(Source: Poll of Polls)
Election Results 2021: पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपला का नाकारलं? भाजपच्या अपयशाची कारणे काय आहेत?
West Bengal Election Results 2021: पश्चिम बंगालमध्ये 292 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसने तब्बल 200 च्या वर जागांवर आघाडी घेतली असून सत्तेकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. भाजपने 80 जागांवर आघाडी घेतलीय तर काँग्रेस-डावे दोन जागांवर पुढे आहेत.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मतमोजणीच्या कलांवरून त्या राज्यात ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलने दोनशेंच्या वर जागांवर आघाडी घेतली असून बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता राज येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 150 च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपला त्याच्या अर्ध्या जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचं दिसून आलं.
पण या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. त्यामागे दहा प्रमुख कारणे काय आहेत हे आपण जाणून घेऊ.
1. देशातली कोरोना स्थिती ज्या पद्धतीने केंद्र सरकारने हाताळली त्यावर पश्चिम बंगालचे मतदार नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारमधील बडे नेते मात्र निवडणुकीच्या कामात जास्त लक्ष घालत होते. याचीही दखल बंगालमधील मतदारांनी घेतली आहे असं लक्षात येतंय.
2. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा कामगार वर्गाला बसला आहे. या काळात लॉकडाऊन लागल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अनेकांचा रोजगार गेला.
3. भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेला एकेरी हल्ला कदाचित मतदारांना पटला नाही.
4. 'सब कुछ मो' असलेल्या भाजपच्या मोदी ब्रँडमुळे जागा वाढल्या पण भाजपला सत्ता मात्र मिळू शकली नाही.
5. भाजपला स्थानिक नेतृत्व नसल्याचा मोठा फटका बसला. त्या उलट ममता बॅनर्जींचे करारी नेतृत्व लोकांनी मान्य केल्याचं पहायला मिळतंय.
6. 'खेला होबे' ला बंगालच्या मतदारांनी कौल दिला. 'खेला होबे' ही ममता बॅनर्जींची घोषणा होती.
7. 'दीदी ओ दीदी' असा भाजपने एकेरी प्रचार केला. तो प्रचार लोकांच्या काही पचनी पडला नाही. त्यामुळे मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून तो धुडकावला.
8. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी वर्ग भाजपवर नाराज होता.
9. दीदींच्या परप्रांतीय टिप्पनीमुळे भाजपचं नुकसान झालं.
10. भाजपने आक्रमक प्रचार केला. तो आक्रमकपणा बंगालच्या मतदारांना भावला नसल्याचं स्पष्ट झालंय.
हे दहा प्रमुख मुद्दे भाजपच्या अपयशामागे असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपने गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी जरी केली असली तरी त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. किमान 150 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 81 जागांवर आघाडी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमधील यशाबद्दल शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
- Coronavirus Cases India Today: देशात कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासात 3.92 लाख नवीन रुग्णांची भर, 3689 रुग्णांचा मृत्यू
- भारतातील कोरोना विस्फोटाने जग स्तब्ध, मोदी सरकार केवळ प्रतिमा निर्मितीमध्ये व्यस्त; काँग्रेस नेते राहुल गांधीची टीका