एक्स्प्लोर

Modi in Varanasi : संख्या कमी जरी असली तरी आम्ही विरोधकांना महत्व देतो : नरेंद्र मोदी

भाजपच्या कार्यकर्त्यांना अस्पृश्यतेनं पाहिलं जातं असल्याचं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

वाराणसी : आम्ही लोकशाही विश्वास ठेवणारे लोक आहोत. विरोधकांची संख्या कमी जरी असली तरी शक्य तिथे आम्ही विरोधकांना महत्व दिलं आहे असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी वाराणत केलं आहे. काशीने मला प्रेम आणि जिव्हाळा दिला आहे.  तसेच कार्यकर्त्यांचं समाधान हाच आपला जीवनमंत्र असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच वाराणसी दाखल झाल आहे. नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. तसेच राजकारणात वावरताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अस्पृष्यतेला सामोरं जावं लागतं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशचं राजकारण देशाची दिशा ठरवत असल्याचं बोलतं वाराणसीतल्या प्रत्येक घरातून मोदी निवडणूक लढवली. वाराणसीतल्या जनतेच्या प्रेमामुळेच मी निवडणुक जिंकल्याचं मोदी म्हणाले. यापुढे पारदर्शक आणि सकारात्मक सरकार चालवण्यावर भर देणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं. Modi in Varanasi | काशी विश्वेश्वराच्या मंदिरात नरेंद्र मोदींकडून पूजा | एबीपी माझा उत्तर प्रदेशमध्ये विजयाची हॅटट्रिक लागल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 2014, 2017 आणि 2019 मधला विजय लहान नाही. आज उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणास नवीन दिशा देत असल्याचही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. देशातील समाजशक्तीने या निवडणुकीची सर्व समीकरणे बदलली आहे. आदर्श संकल्पनेच्या सर्व आकडेवारींना या निवडणुकीत समाजशक्तीने पराभूत केलं असल्याचंही मोदी म्हणाले. याआधी दौऱ्यात पंतप्रधान मोदी काशीविश्वेश्वराचं दर्शन घेत पूजा केली. शिवाय काशीचा कोतवाल असलेल्या कालभैरवाचंही दर्शन घेतलं. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी शहरभर सजावट करण्यात आली आहे. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार केलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीविश्वनाथ मंदिरात त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा बरोबर होते. Modi in Varanasi | नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी काशी नटली | एबीपी माझा 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार दरम्यान दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून ही माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी 30 मे रोजी होणार यासंदर्भातलं सर्वात पहिलं वृत्त एबीपी माझानं दिलं होतं. राष्ट्रपती भवनाच्या ट्विटनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. संबंधित बातम्या Modi in Varanasi : ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी वाराणसीत, काशीविश्वेश्वराची पूजा रामाचं कार्य होणारच, सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget