UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये दोन राष्ट्रीय पक्षांचा 'फ्लॉप शो'; दोन अंकी आकडाही गाठता आला नाही
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) हे दोन राष्ट्रीय पक्ष आतापर्यंत दोन अंकी आकडा पार करू शकलेले नाहीत.
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) हे दोन राष्ट्रीय पक्ष आतापर्यंत दोन अंकी आकडा पार करू शकलेले नाहीत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बसपा 5 आणि काँग्रेस केवळ 6 जागांवर पुढे आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप-243, समाजवादी पक्ष-118, काँग्रेस-6 आणि बसपा केवळ पाच जागेवर पुढे आहेत.
काँग्रेस आणि बसपा हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. काँग्रेसने यावेळी यूपीमध्ये प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती आणि मायावतींच्या नेतृत्वाखाली बसपा रिंगणात होती. मायावती (Mayawati) 2007 साली मुख्यमंत्री झाल्या. मात्र, 2012 मध्ये त्यांच्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बसपा पुन्हा सत्तेत आलेला नाही.
काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर जवळपास तीन दशकांनंतर सर्व 403 जागा युती न करता लढत असली तरी ट्रेंडमध्येही पक्षाची अवस्था वाईट असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीच्या एक दिवस आधी प्रियंका गांधी वड्रा यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, निकाल काहीही लागला तरी मी आणि काँग्रेस लोकांचे प्रश्न मांडत राहणार. सध्या दिसत असलेल्या ट्रेंडमध्ये भाजप (BJP) पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापित करता असल्याचं चित्र आहे. तर या निवडणुकीत समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट जागा मिळताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
UP Election Result 2022 : गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, रायबरेली आणि अमेठीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा