Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
ज्या अरबी समुद्रात मोदीजींनी शिवस्मारकाचे जलपूजन केलं, ते शिवास्मारक समुद्रातून नेमकं कधी बाहेर काढणार? त्यांनी समुद्रमंथन करून हे शिवस्मारक बाहेर काढावं, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय

Uddhav Thackeray BMC Election 2026: भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी आमच्या छोट्या आणि साध्या कामांचं श्रेय घेण्याऐवजी आपलं मोठं काम सांगावं, जसं पंतप्रधान मोदींनी (PM Modi) कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली, अरबी समुद्र मिंध्यांनी बांधला. ही त्यांची कामे मागे पडताय. अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांनी बांधला ज्या अरबी समुद्रात मोदीजींनी शिवस्मारकाचे जलपूजन केलं, ते शिवास्मारक समुद्रातून नेमकं कधी बाहेर काढणार? त्यामुळे त्यांनी समुद्रमंथन करून हे शिवस्मारक बाहेर काढावं, अशी बोचरी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलीय.
Uddhav Thackeray : मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यावेळेस...
पंतप्रधान मोदींनी कैलास पर्वत बांधलाय. स्वर्गातून गंगा त्यांनीच आणली आहे. समुद्रमंथही त्यांनीच केलं होतं. अरबी समुद्र मिंधे आणि फडणवीसांनी तयार केला आहे. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेऊ नये. आम्ही 25 वर्षांत मुंबईत फार साधी-साधी कामं केली आहेत. साधं कोस्टल रोडचं काम केल, साधं मध्य वैतरणा धरण बांधलं, करोना काळात लहानसहान कामं केली आहेत. गेल्या 25 वर्षात आम्ही मुंबईत अतिशय साधी साधी कामे केली आहेत आणि तीच काम आम्ही आता मुंबईमध्ये होर्डिंगवर दाखवत आहोत. ज्यामध्ये साधं कोस्टल रोडचे काम, साधं वैतरणा धरणाचं काम, कोरोना काळातील साधी आणि छोटी छोटी कामे केली आहेत. ज्यावेळी मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यावेळेस कोस्टल रोडच्या बांधकामचे प्लॅनिंग, वैतरणा धरण, अनेक हॉस्पिटल आम्ही बांधण्याचं काम केलंय. ही अतिशय छोटी कामे आम्ही केली आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं मोठं श्रेय जनतेला सांगावं, आमचं कसलं श्रेय घेताय? असेही उद्धव ठाकरे म्हणाले
Uddhav Thackeray on Rahul Narwekar: अध्यक्षांच वर्तन उद्दाम, त्यांना तत्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करा
संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एक नवचैतन्य सळसळतंय, साहजिकच आनंद आहे. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने शिवशक्तीचा वचननामा आम्ही जाहीर करतो आहे. शिवशक्तीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आहे, शिवसेना (Shivsena) आहे, शरद पवारांचा ओरिजनल पक्ष राष्ट्रवादी (NCP) आहे. त्यांच्या प्रतिनिधी म्हणून विद्या चव्हाण या आलेले आहेत. एकूणच लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाल्यासारखी परिस्थिती आहे. मतचोरीनंतर आत्ता उमेदवारांची पळावापळवी सुरु केली आहे. बिनविरोध निवडणूक होताय. राहुल नार्वेकर धमक्या देतोय. हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात, ते आमदार सारखे वागू शकत नाही. विधानसभा अध्यक्ष अधिकारांचा गैरवापर करत आहेत. मंत्र्यांना देखील आपला लावाजवा घेऊन निवडणुकांच्या प्रचारात फिरता येत नाही. ते स्वताला नायक पिक्चरमधले अनिल कपूर समजताय. अध्यक्षांच वर्तन उद्दाम, त्यांना तत्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करावा, अशी मोठी मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.
संरक्षण काढून घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना सभागृहात असतो. सभागृहाबाहेर ते आमदार असतात. राहुल नार्वेकर धमक्या देतोय. त्यामुळे हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून त्यांना निलंबित केलं पाहिजे. सोबतच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या




















