एक्स्प्लोर

Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: शब्द ठाकरेंचा! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर, राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात

Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं

Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंनी 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करुन केली. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरु केली. बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. भाजपचा राहुल नार्वेकर हा आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतो. त्यांचा अधिकार विधानसभेत आहे, बाहेर ते एक आमदार आहेत. ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात. हे विधानसभा अध्यक्षपदाच्या प्रतिमेला छेद देणारे वक्तव्य आहे. ते नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे समोरच्याचे संरक्षण काढून घ्यायला सांगतात. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 

आम्ही 25 वर्षांत मुंबईत फार साधी-साधी कामं केली आहेत. साधं कोस्टल रोडचं काम केलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलं आहे, कोरोनात लहानसहान कामं केली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामं केली, मोदींनी कैलास पर्वत बांधला आहे.  स्वर्गातून गंगा त्यांनी आणली आहे. मिंध्यांनी अरबी समुद्र तयार केला आहे, ही त्यांची काम मागत पडत आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईच्या रिगल चौकात शिवसेनाप्रमुखांचा पुतळ्याची जागा आम्ही निवडली, तो पुतळा माझ्या देखरेखीत तयार झाला, त्याचे श्रेयही मिंधे घेत आहेत. त्याऐवजी अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांनी तयार केला, अरबी समुद्रात मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन तयार केले होते. ते पाण्यातील शिवस्मारक बाहेर कधी काढणार? समुद्र मंथनही मोदींनी केलं होतं, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा पाऊल ठेवले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांनी हाताला धरुन राज ठाकरे यांना शिवसेना भवनात नेले. राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा वचननामा आता मुंबईकरांना कितपत भावणार, हे आता आगामी काळात दिसून येईल. 

शिवसेना आणि मनसेचा हा वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वी आज सकाळपासून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरु होती. संजय राऊत यांनी आज सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात आले. यानंतर शिवसेना भवनात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक लहानशी बैठक होऊन पत्रकार परिषदेतील मुद्दे निश्चित करण्यात आले. या बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे नेते उपस्थित होते. 

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना भवनात हशा पिकला

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी, राज ठाकरे हे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. संजय राऊत यांनी मी 20 वर्षांनी आल्याचा उल्लेख केला. ते ऐकून मला वाटत होतं की, मी 20 वर्षांनी सुटून आलोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

Mumbai BMC Election 2026:  राज-उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय घोषणा?

मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच

महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिव्ये मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार.

मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल.

पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.

मुंबईकरांचा स्वाभिमान

घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.१,५०० स्वाभिमान निधी देणार.

कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद-ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय समाविष्ट असेल.

कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी मासाहेब किचन्स सुरू करणार.

मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधणार. या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पेंड व्हेंडिंग मशिन्स असतील. लहान मुलांचे डायपर्स बदलण्याची सोय असेल.

पाळणाघरे

नोकरदार पालक तसंच कष्टकरी महिला यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणाघरे सुरू करणार

पाळीव प्राणी

मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट क्रेश, पेट एम्ब्यूलन्स, पेट क्रेमॅटोरियम यांची सोय उपलब्ध करून देणार.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना

एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी आणि २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.

रोजगार

मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार

महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑन-साइट अॅप्रेंटिसशीप देऊन मराठी तरूण-तरूणींना कामाचा अनुभव देणार.

मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह उभारणार.

महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएसीच्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार.

मैदाने

छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखी चांगली मैदानं, उद्यानं उभी केली जातील. जिथे नागरिकांना बसण्यासाठी कट्टे असतील. ती मैदानं भिंतींनी झाकली जाणार नाहीत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील तसंच प्रत्येक वार्डात एक

आजोबा-आजी उद्यान असेल.

करमुक्ती व कर सवलत

 

७०० चौ. फुटांपर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ

५०० चौ. फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांवरील मालमत्ता कर माफ केल्यामुळे तब्बल १४ लाख मुंबईकर फ्लॅटधारकांचे प्रतिवर्षी किमान रु. ५,००० ते कमाल रु. १५,००० वाचले. आता ५०० चौ. फुटांवरील व ७०० चौ.

फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करणार.

सोसायट्यांना १ लाख रूपयांची सबसिडी

कचरा विलगीकरण, गांडुळ खत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर एनर्जी तसेब सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देणार.

या प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सोसायट्यांना प्रोत्साहनपर एक लाख रुपयांची सबसिडी देणार

पर्यावरणस्नेही सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी बोनस एफएसआय पर्यावरणस्नेही सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी त्यांना अतिरिक्त चटईक्षेत्र देणार.

कचरा कर रह। कचरा संकलनासाठी प्रस्तावित कर रद्द करणार.

शिक्षण

महापालिकेच्या शाळा कदापी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही.

दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार.

मुंबई महापालिकेच्या शाळांचा संपूर्ण कायापालट करण्यात शिवसेनेला गेल्या १० वर्षांमध्ये यश आलेलं आहे. ज्या शाळांकडे पाहून काही लोक नाके मुरडत होते, त्या महापालिका शाळांचा उंचावलेला

शैक्षणिक दर्जा, दहावीचा उत्तम निकाल आणि एसएससी बोर्ड, आयसीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयबी बोर्ड आदी अभ्यासक्रमांमुळे पालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यायला अक्षरशः रांगा लागत आहेत.

मुंबईतल्या महागड्या, खासगी शाळांप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या पब्लिक स्कूल्स' या आता उत्तम, गुणवत्तापूर्ण, अत्याधुनिक शिक्षणासाठी ओळखल्या जातात,

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मातृभाषा, राजभाषा मराठी आणि जागतिक भाषा इंग्रजी यायलाय हवी हा

आमचा आग्रह आहे. मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असेल जी मराठी, हिंदी गुजराती, उर्दू, तेलगू, तामिळ, कन्नड आणि इंग्रजी या आठ माध्यमांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत उपलब्ध करून देते.

शिक्षण अनुभव सहज, सुंदर आणि प्रभावी व्हावा यासाठी इयत्ता आठयीपुढील प्रत्येक विद्यार्थ्यांला टॅब देणार

प्रत्येक शाळेत व्हर्चुअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी तसंच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचावापर करून विद्यार्थ्यांना नव्या जगातील नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करणार

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा फिटनेस आणि पोषक (शाकाहारी व मांसाहारी-अंग्रे) आहारावरही

विशेष लक्ष देणार.

महापालिकेच्या सर्व माध्यमांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'बोलतो मराठी' हा हसत-खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार.

मुंबई महापालिकेची वाचनालयं ही अत्याधुनिक आणि डिजिटल केली जातील. आणि प्रत्येक

वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल,

 

स्मशानभूमी

हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिश्चन दफनभूमी तसंच इतर धर्मीयांच्या स्मशानभूमीत शाश्वत आणि आवश्यक त्या इम्प्रूव्हमेंट व विकास करणार

मुंबईची अनुभूती

मुंबईचं 'मुंबईपण' अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स पाळला जाईल आणि मुंबईच कॅरेक्टर जपलं जाईल.

मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करणार

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्यसमर स्मृतीदालन उभारणार

सात बेटं ते देशाची आर्थिक राजधानी हा गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षातील मुंबईच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा, कापड गिरण्या ते आयटी हब हा प्रवास तसंच मुंबईला घडवण्यात मोलाचा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियम उभारणार

स्व. बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरु केलं जाईल. जिये उपयोजित कला, फाईन आर्ट्स, सिनेमा तंत्र यांचं शिक्षण मिळेल

मुंबई महापालिका २०३१ पर्यंत १० नवीन मध्यम व छोट्या आकाराची नाट्घगृहं व कलादालने उभारेल.

मुंबईसाठीची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा

मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कंट्रोल रूम यांचे आधुनिकीकरण करून प्रत्येक

प्रशासकीय विभागासाठी जलद दले (रॅपिड फ्लीट) सज्ज ठेवणार.

मुंबईतल्या उंचच उंच इमारती आणि झोपडपट्टी परीसरातील आव्हाने लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे

आधुनिकीकरण करणार प्रत्येक वॉर्डात मिनी फायर ब्रिगेड आणि फायर फायटिंग मोटरसायकल्स

उपलब्ध असतील.

डॅझमेंट रिस्पॉन्स वेहिकल आणि ऑल टेरेन ऑल पर्पज वेहिकल उपलब्ध करणार.

आरोग्य

प्राथमिक आरोग्य सेवाच नव्हेत, तर सर्व प्रकारच्या, अगदी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवता याव्यात यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेली तीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रूग्णालये यांनंतर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय येथे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईतील रूग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालयं (शताब्दी-गोवंडी, शताब्दी-कांदिवली, एम.टी. अग्रवाल-मुलुंड, भगवती- बोरिवली, राजावाडी-घाटकोपर येथे) सुरू करणार.

पालिका रूग्णालयांतील ओपीडी क्षमता दुप्पट करणार

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोबोटिक ऑपरेशन थिएटर तसंच डिजिटल सब्स्ट्रॅक्शन एंजिओग्राफी / जलद रिकव्हरीसाठी लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरु करणार. शताब्दी (कांदिवली), एमटी अग्रवाल (मुलुंड)

देणार नाही.

आणि शताब्दी (गोवंडी) रुग्णालयांचे खासगीकरण होऊ

केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त जेनेरिक मेडिसिन दुकानांमध्ये पालिका रुग्णालयातील तसंच

दवाखान्यातील डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन दिलेल्या रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करुन देणार.

ज्येष्ठ नागरिकांसाठी २४४७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि आरोग्यसेवा आपल्या दारी (हेल्थ-टू-होम)

या सेवा सुरू करणार.

महापालिका स्वतःच्या मालकीची रूग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार. मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल.

रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन्स (अॅम्ब्युलन्स) सेवा..

मुंबईकरांना रॅपिडोच्या बाईकची नव्हे तर वाहतूककोंडीच्या तासांमध्येही अगदी गल्लीबोळात सहज आणि वेळेवर पोहोचेल अशा रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन (अॅम्ब्यूलन्स) सेवेची आवश्यकता आहे.

गंभीर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तसंच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आलेल्या रुग्णांना प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी (पॅरामेडिकल स्टाफ) बाईकवर उपलब्ध असलेल्या जीवनरक्षक उपकरणांच्या (हार्ट शॉक मशीन - Defibrillator, ऑक्सिजन, नेब्यूलायजर आदींच्या) सहाय्याने 'गोल्डन अवर' मध्ये प्राथमिक उपचार करतील आणि रुग्णाला लवकरात लवकर नजीकच्या रुग्णालयात पोहोचवतील.

कचरा व्यवस्थापन

मानखुर्द डम्पिंग ग्राऊंड येथील बायो-मायनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारणार.

प्रस्तावित कचरा कर मुंबईकरांवर लादला जाणार नाही.

पुढील १० वर्षांत कांजूरमार्ग कचराभूमी बंद करून, महापालिकेच्या २४ प्रभागांत स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र उभारली जातील.

मुंबईकरांची जीवनशैली आणि वाहतुकीची रहदारी पहाता रात्रीच्या वेळची यांत्रिक सफाई (Mechanised Sweeping) मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येईल.

कंस्ट्रक्शन डिमोलिशन डेब्रिसवर (राडारोडा) महापालिकेकडून प्रोसेसिंग करणार.

मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार : २०१७ मध्ये ही क्षमता- व्याप्ती ५६ टक्के होती. आता ८६ टक्के आहे. पुढील ५ वर्षांत १०० टक्के पूर्ण करणार.

रस्ते

मुंबईत उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील. कंत्राटदाराकडून रस्त्याची १५ वर्षाची हमी घेतली जाईल आणि रस्त्यावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे खड्डे पडल्यास त्याच्याकडून जबर दंड वसूल केला जाईल.

मुंबईतील अनेक रस्ते एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, पोर्ट यांच्या

अखत्यारीत येतात. यापुढे सर्व रस्ते हे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आणले जातील.

सर्व संबंधित यंत्रणांच्या परवानग्या आल्याशिवाय रस्त्यांचं कुठलंही काम सुरु करू दिलं जाणार नाही.

पाणी आणि सांडपाणी

समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करणारा निःक्षारीकरण (डिसॅलिनेशन) प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार.

सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मलः निसारण प्रकल्प (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) वेळेत पूर्ण करणार हे

पाणी अन्य कामांसाठी वापरणार.

नालेसफाईची कामं ही वर्षाची १२ महिने केली जातील आणि पुढील ५ वर्षांत नाल्यांवर संरक्षक जाळी बसवली जाईल.

नवीन इमारतींमध्ये rainwater percolation pits आणि मुंबईत काही ठराविक जागी rain water holding tanks साकरणार.

प्रत्येकाला पाणीहक्क
पाण्याचे दर स्थिर ठेवून मुंबईकरांना, मग तो टॉवरमध्ये राहणारा असो की वस्ती

पाड्यात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारच.

फूटपाथ आणि मोकळ्या जागा

रस्त्यांइतकेच फूटपाथही महत्वाचे आहेत. पादचारी प्रथम (Pedestrian First) धोरणाची अंमलबजावणी करून फुटपाथ पेव्हर ब्लॉक-फ्री आणि दिव्यांग स्नेही करणार.

शब्दांचा खेळ करून मुंबईतील मोकळ्या जागा आणि विशेषतः महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल आणि अन्य मोकळ्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण दिल्या जाणार नाहीत.

पर्यावरण- मुंबईकरांना मोकळा श्वास

गेल्या तीन वर्षात वाढलेले प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन (एमसीईपी) योजना अंमलात आणणार.

अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसंच मुंबईतील कांदळवनं आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

 

खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास

तिकीट दरवाढ कमी करून रू. ५-१०-१५-२० फ्लॅट रेट ठेवणार.

बेस्टच्या ताफ्यात १०,००० ईलेक्ट्रिक बस तसंच २०० डबल डेकर ईलेक्ट्रिक बसचा समावेश करणार.

जुने मार्ग पुन्हा सुरू करणार.

महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास.

 

१०० युनिटपर्यंत वीज मोफत

घरगुती वीज वापर करणाऱ्या 'बेस्ट विद्युत' च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार.

पूर नियंत्रण

ब्रिटानिया (माझगाव), इर्ला (पार्ले), लवग्रोव (वरळी) तसेच क्लिवलँन्ड (वरळी) येथे पम्पिंग स्टेशन उभारून मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

उपनगरात मोगरा तसेच माहुल येथे पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी येथील जमिनींशी संबंधित कायदेशीर

परवानगी केंद्राकडून येणे प्रलंबित आहे. ही परवानगी मिळवून लवकरात लवकर ही दोन पम्पिंग स्टेशन्स उभारणार.

प्रभावी पूर नियंत्रण व्यवस्था उभारण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डिंग टॅक्स बांधणार.

मिठी, ओशिवरा, पोयसरस दहिसर या चार नद्या आणि माहुल खाडी यांची शास्त्रीय पद्धतीने

स्वच्छता करून पर्जन्य जल व्यवस्थापन अधिक सक्षम करणार.

 

आर्थिक राजधानी मुंबई, सुसाट मुंबई

तिसरी मुंबई, चौथी मुंबईच्या घोषणांच्या काळात आपल्या मूळ मुंबईचा पुनर्शोध (Re-Inventing Mumbai) अत्यावश्यक असून मुंबईचा अविभाज्य भाग असलेल्या पूर्व वॉटरफ्रंट क्षेत्रातील - बीपीटीच्या सुमारे १,८०० एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र तसंच सागरी पर्यटन केंद्र उभारणार.

मुंबईतून गुजरातला नेलेले आर्थिक वित्तीय केंद्र मुंबईत पुनःस्थापित करणार ऑलिम्पिक दर्जाची स्पोर्ट्स सिटी उभारणार. इथल्या स्थानिक नागरिकांचे जिथल्या तिथेच पुनर्वसन करणार आणि मुंबईकरांना मोकळ्या जागा (खेळाची मैदाने आणि बागा) उपलब्ध करणार.

मुंबईचा कोस्टल रोड आणि पूर्व किनारपट्टी यांना जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळं निर्माण करून मुंबईभोवती मास रॅपिड मोबिलिटीसाठी रिंगरोड ग्रिड उभारणार

मुंबईतील सध्याचे विकास प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण करून अनावश्यक खोदकाम रोखणार.

लँडस्केप अर्बनिजम आणि टॅक्टिकल अर्बनिजम या संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मुंबईला अधिक कार्यक्षम, सस्टेनेबल आणि समतापूर्ण करणार.

पालिका आणि बेस्ट कर्मचारी

बेस्ट कर्मचा-यांचे वेतन, पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या समस्या तातडीने मार्गी लावणार. बीएमसी कर्मचा-यांप्रमाणे बेस्ट कर्मचा-यांनाही बोनस देणार. बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही. बेस्ट यंत्रणेला सर्वार्थाने सुदृढ करणार.

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सध्या वैद्यकीय उपचारार्थ रु ५ लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम) आहे. त्यामध्येही कर्मचाऱ्यांच्या हुद्दा-श्रेणीनुसार कमाल मर्यादा विहित केलेली आहे. ही हुद्दानिहाय असलेली असमानता दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना - सर्व आजारांसाठी सरसकट रुपये १० लाख इतक्या कमाल रक्कमेची आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम) सुरू करण्यात येईल.

महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांमधील इमारतींना पुनर्विकासाकरिता अधिक चटईक्षेत्र मिळावे यासाठी धोरण ठरवून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेणार

पालिकेच्या प्रत्येक जनरल आणि पेरिफेरल हॉस्पिटलमध्ये सर्व बीएमसी आणि बेस्ट कर्मचा-यांसाठी प्राधान्याने स्वतंत्र सुविधा उपलब्ध करुन देणार.

सफाई कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी आम्हीच योजना आणली आणि राबवली. त्यासाठी निधीची तरतूदही केली. सध्या एकूण १२,००० घरं बांधली जात आहेत. पुढच्या ५ वर्षांत उर्वरित १६,००० घरं बांधून सफाई कामगारांना हक्काचं घर देणार. सफाई कामगारांना नोकरीची सुरक्षितता देणार.

वाहतूककोंडी आणि पार्किंग

मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूककोंडीचे २०० स्पॉट्स निश्चित करून तिथे टॅक्टिकल अर्बनिजम- सिव्हिक डिझाइनच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना आखणार.

महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग सुविधा मोफत करणार.

नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग सुविधा देणे बंधनकारक करणार. मुंबईकरांच्या वाहतुकीच्या समस्या प्रभावीपणे कमी करण्यासाठी नागरी पायाभूत सुविधांच्या

बांधकाम व्यवस्थापनासोबतच सर्वसमावेशक आपत्कालीन वाहतूक व्यवस्थापन योजना लागू केल्या जातील.

मंडई
भाजीपाला, फुले, मासळी व इतर म्युनिसिपल मार्केट्सचे आधुनिकीकरण आणि नूतनीकरण केले जाईल. मासळी बाजार आहेत, तिथेच ठेवले जातील.

युवा मुंबईकर

प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार
जुन्या व्यायामशाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करणार

मुंबईत आयोजित म्युझिक कॉन्सर्ट आणि आयपीएल सामन्यांसाठी खास 'मुंबईकर स्टैंड' मध्ये एक टक्का आसने १८ ते २१ वयोगटातील युवा मुंबईकरांसाठी लॉटरीद्वारे मोफत देणार

पालिका प्रशासन- डिजिटल द्विन

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध नागरी सोयी-सुविधांसाठी मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी महापालिकेच्या महत्वाच्या ८० सेवा चॅटबॉटद्वारे उपलब्ध करून दिल्या होत्या.

आता मुंबईचं डिजिटल मॅपिंग करून डिजिटल द्विन उभारून मुंबई महापालिकेचं प्रशासन अधिक सुलभ- सोपं करणार.

कोळीवाडे आणि आदिवासीपाडे

कोळीवाड्यांच्या आणि आदिवासी पाड्यांच्या क्लस्टर विकासाचे गृहनिर्माण धोरण तसंच 'झोपडपट्टी' म्हणून केलेले त्यांचे वर्गीकरण आम्हाला अमान्य आहे आणि म्हणूनच ते रद्द करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत कोळीवाडे, आदिवासी पाडे या भूमीपुत्र समाजांसाठी समुदाय-आधारित स्वयंविकास धोरण सुनिश्चित केले जाईल.

मासेमारी करणा-या कोळी गावांचा तसंच मच्छीमार समाजाच्या सामायिक मालमत्ता / सुविधांचा महाराष्ट्राच्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात (CZMP) समावेश करून त्याचे पर्यावरणीय हक्क निश्चित केले जातील

महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, बीएमसी डीपी विभाग, समुदाय प्रतिनिधी यांच्या संयुक्त सीमांकन सर्वेक्षणानुसार कोळीवाडे व गावठाणांची अचूक व संपूर्ण सीमारेषा जाहीर करून जमिनीचे हक्क दिले जातील आणि ओडिशामध्ये काही वर्षापूर्वी जसे हस्तांतरण करण्यात आले, तसेच येथेही करण्याचा प्रयत्न केला जाईल.

योग्य व शाश्वत विकास आराखडा (DP) धोरणात्मक उपायांद्वारे कोळी समाजाला विकास हक्क देण्यात येतील, जेणेकरून त्यांना मच्छी वाळवण्याच्या मोकळ्या जागा, जाळे विणण्याची ठिकाणे, बर्फ कारखाने जपता येतील, तसंच हळूहळू विस्तार, उन्नतीकरण (अपग्रेडेशन) पायाभूत सुविधा, कम्युनिटी लैंड रिझर्व्ह,

वारसा संवर्धन आर्दीच्या माध्यमातून स्वयंविकसित घरे बांधता येतील

कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यातील बांधवांच्या उपजीविकेचे हक्क सुरक्षित केले जातील, विशेषतः मच्छीमार महिलांच्या हक्कांचे संरक्षण व उपजीविकेच्या सन्मानासाठी बाजारपेठा व स्वच्छता पायाभूत सुविधांचे शाश्वत उन्नतीकरण, योग्य परवाने उपलब्ध करून देणे इत्यादी उपाय केले जातील

गावठाण कोळीवाड्यातील बांधकामं नियमित केली जातील.

मुंबई शहर नियोजनाचे सर्वाधिकार महापालिकेला

मुबईचं आंतरराष्ट्रीय महत्व आणि वाढत्या लोकसख्येसाठीच्या विकासात्मक गरजा ओळखून; 'ब्लेम गेमचं राजकारण' कायमचं संपवण्यासाठी मुंबई महापालिकेलाच मुंबईच्या शहर

नियोजनाचे अंतिम सर्वाधिकार असायला हवेत, यासाठी भारतीय संविधानानुसार अनिवार्य असलेल्या 'वन सिटी, वन रिस्पॉन्सिबिलिटी, वन अकाऊंटिबिलिटी' धोरणाचा राज्य सरकार तसच केंद्र सरकारकडे आग्रही पाठपुरावा करणार

आणखी वाचा

नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या मनसेसोबत विश्वासघात झाला, महिला नेत्याने आधी उमेदवारी अर्ज मागे घेतला अन् आता थेट भाजपध्येच प्रवेश केला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget