(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exit Poll 2022 : ‘चाणक्य’ची भविष्यवाणी, पंजाबमध्ये आप शतक ठोकण्याचा अंदाज
Chanakya Exit Poll : पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे.
Chanakya Exit Poll : पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे. टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये आप पक्षाला जवळपास 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 100 ते 111 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पक्षाला दहा ते 17 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. अकाली दल-बीएसपी पक्षाला सहा ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला एक किंवा दोन जागा मिळू शकतात. तर अपक्ष एका जागेवर येण्याची शक्यता आहे.
मतांच्या टक्केवारीबाबत विचार करायचे झाल्यास एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 45 ते 48 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेस पक्षाला 23 ते 28 टक्के मते मिळू शकतात. अकाली दल-बीएसपीला 16% ते 19 % मते मिळू शकतात. पंजाबमध्ये बाजपला 9 ते 12 टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यावर सात ते 10 टक्के मते मिळू शकते.
#TCPoll
— Today's Chanakya (@TodaysChanakya) March 7, 2022
Punjab 2022
Seat Projection
AAP 100 ± 11 Seats
Cong 10 ± 7 Seats
SAD+ 6 ± 5 Seats
BJP+ 1 ± 1 Seats
Others 0 ± 1 Seats#News24TodaysChanakyaAnalysis
पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान –
117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.
10 मार्च रोजी होणार फैसला!
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाल. उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्याचे मतदान आज पूर्ण झाले. पाचही राज्याचा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी मिळणार आहे. 10 मार्च रोजी पंजाबमध्ये कुणाची सत्ता येणार हे समजणार आहे.
पंजाब निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे
शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न
2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? -
2017 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती.