एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही, शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय; नवाब मलिकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Nawab Malik Shocking Claim: नवाब मलिक यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार?

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय होईल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सध्या वेगळंच काहीतरी सुरु आहे. वेगवेगळी चर्चा या महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल, हे आता ठामपणे सांगता येणार नाही. शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातही काहीतरी सुरु आहे, अशी जोरदार चर्चाही आहे. विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील, हेदेखील सांगता येत नाही, असे वक्तव्य अजितदादा गटाचे नेते नवाब मलिक यांनी केले. ते 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी नवाब मलिक यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता निकालानंतर कोणता पक्ष कोणासोबत जाईल, हे सांगता येत नाही. विधासभा निवडणुकीनंतर अजित पवार हे किंगमेकर असतील, हे मी आताच सांगतो. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळे लोक माझ्याकडे उभे असतील. तुम्ही तोपर्यंत वाट पाहा, असे नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र, नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य करुन राजकारणात नवा ट्विस्ट आणला आहे. नवाब मलिक यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

अणुशक्ती नगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून माझी मुलगी सना हिने कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांशी उत्तमप्रकारे संवाद साधायला सुरुवात केली होती. या मतदारसंघातील अनेक लोक माझ्याऐवजी सनाला भेटायला यायचे. त्यामुळे मी आता निवडणूक लढायची नाही, असे ठरवले. परंतु, शिवाजीनगर-मानखुर्द नगरमधील जनतेने मला या मतदारसंघातून लढण्याचा आग्रह धरला. या मतदारसंघात एखाद्या चित्रपटात दाखवतात, तशी परिस्थिती आहे. याठिकाणी प्रचंड गुंडगिरी, नशेखोरी आणि हुकूमशाही आहे. या सगळ्याला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मी लोकांच्या आग्रहाखातर शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

अजित पवारांनी मला खूप मदत केली: नवाब मलिक

मला महायुती किंवा अजित पवार गटाची भूमिका पटते म्हणून मी त्यांच्यासोबत नाही. तर मला अजित पवार यांनी पडत्या काळात जी मदत केली, त्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे. मी तुरुंगात गेलो त्या काळात अनेक नेत्यांनी माझ्याविषयी सहानुभूती व्यक्त केली. पण अजित पवार यांनी प्रत्यक्षात मला मदत केली. त्यामुळे मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. जर मी मविआमध्ये थांबलो असतो तर मला तिकीटही मिळू शकले नसते. मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

आणखी वाचा

ठाकरेंसाठी अडचण ठरणाऱ्या काँग्रेसने बंडखोराच्या समजुतीसाठी हैदराबादवरुन खास नेत्याला बोलावलं पण..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget