Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठाकरेंसाठी अडचण ठरणाऱ्या काँग्रेसने बंडखोराच्या समजुतीसाठी हैदराबादवरुन खास नेत्याला बोलावलं पण...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: हैदराबादचे आमदार रेड्डी माझी मनधरणी करण्यासाठी आले होते, पण मी त्यांची भेट नाकारल्याचे गोरेगावकर यांनी सांगितले.
हिंगोली: हिंगोली विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे (Congress) शिष्टमंडळ आले होते. त्या शिष्टमंडळाला भाऊ पाटील गोरेगावकर यांनी भेट नाकारली असून मी जनतेला शब्द दिला आहे आणि त्यामुळे मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याची भूमिका भाऊ पाटील गोरेगावकर (bhau patil goregaonkar) यांनी घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून आजच्या दिवशी गोरेगावकर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उमेदवारी मी ठाम आहे लोक आग्रहास्तव उमेदवारी भरली आहे मतदार संघातच नाही तर जिल्हाभरात माहीत आहे की मी दिलेल्या शब्द मागे घेत नाही सहा ते सात हजार लोकांनी मीटिंग घेतल्यानंतर लोकांनी सांगितले काँग्रेस पक्षावर अन्याय झालेला आहे. जिल्हामध्ये तीन जागा आघाडीमध्ये तीन पक्ष म्हणून काँग्रेसला एक जागा घ्यायला पाहिजे होती ती जागा त्यांनी घेतली नाही. त्यामुळे लोकांनी सांगितलं की अपक्ष उभ राहिला पाहिजे आणि त्यामुळे मी अपक्ष उभा राहिलो आहे. लोकांना शब्द दिल्यानंतर मी पक्षाचाही आदेश मानत नाही. लोकांना दिलेला शब्द मी कधीच मोडणार नाही आणि त्यामुळे माझ्या उमेदवारीवर ठाम आहे
काँग्रेस शिष्टमंडळ भेट नाकारली
हैदराबादचे आमदार रेड्डी माझी मनधरणी करण्यासाठी आले होते. जिल्हाध्यक्षांनी मला फोन केला की, रेड्डी भेटण्यासाठी आले आहेत. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मी काही भेटू इच्छित नाही. जेव्हा जिल्ह्यात काँग्रेसवर अन्याय होताला तेव्हा कोणीही पुढे आलेले नाही. काँग्रेससाठी जागा कोणी सोडून घेतली नाही त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस जिवंत ठेवायचे असेल तर मला निवडणुकीत उभे राहणे गरजेचे आहे आणि त्यामुळे आपण मला भेटायला येऊ नका, असं त्यांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीमध्ये माझं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालेलं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द दिला होता. कदाचित कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना याची जाणीव करून दिली नसेल. कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना आठवण करून देणे अपेक्षित होतं की, आपण हिंगोली शब्द दिलेला आहे, असे गोरेगावकर यांनी म्हटले.
जी निवडणूक मी लढतो ती लोकशक्तीच्या जोरावर लढतो परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवण्याचं काम माझे वडील बाबुराव पाटील यांनी केला होता. शेकाप पक्ष संपवत काँग्रेस अस्तित्वात आणली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली तेव्हा काँग्रेसमध्ये कोणीही राहिला नव्ह.ता तेव्हा आम्ही काँग्रेसचे झेंडा हाती घेतला होता. हा हिंगोली जिल्हा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असलेला जिल्हा खोडून काढण्याचे काम या ठिकाणी केलं हिंगोली विधानसभेत दोन वेळेस कधीही आमदार निवडून आला नाही, अशा परिस्थितीतही लोकांनी एक दोन वेळेस नाहीतर तब्बल तीन वेळेस मला निवडून दिले आणि त्याच लोकांनी मला या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी उभा केला आहे त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, भाऊ पाटील गोरेगावकर यांनी सांगितले.
आणखी वाचा