एक्स्प्लोर
वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं
वसुंधरा राजे आपल्या झालरापाटन मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसने वसुंधरा राजेंच्या विरोधात भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना मैदानात उतरवलं होतं, मात्र ते निष्प्रभ ठरले.
![वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं Rajasthan Assembly Election Results 2018 | CM Vasundhara Raje won, but BJP lose वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/11122005/Vasundhara-Raje.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दर पाच वर्षांनी राजस्थानमधील सत्तापालटाचा सिलसिला कायम राहिला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या असल्या, तरी त्यांना आपल्या नेतृत्वात सरकार राखण्यात अपयश आलं आहे. काँग्रेसने राजस्थानात एकहाती सत्ता मिळवली आहे.
गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली. राजस्थानने वसुंधरा राजे यांना सपशेल नाकारलं.
दरम्यान, वसुंधरा राजे झालरापाटन मतदारसंघातून 27 हजार 92 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसने वसुंधरा राजेंच्या विरोधात भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना मैदानात उतरवलं होतं, मात्र ते निष्प्रभ ठरले.
2003 आणि 2013 मध्ये म्हणजेच दोन वेळा वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. मात्र यावेळी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे संस्थान काँग्रेसने खालसा केलं.
2003 पासून सलग तीन वेळा (2003, 2008 आणि 2013) वसुंधरा राजे यांनी आमदारकी मिळवली आहे. त्याआधी 1985 मध्येही त्या ढोलपूर मतदारसंघातून आमदार होत्या. म्हणजेच यंदा त्या पाचव्यांदा आमदारपदी विराजमान होतील. तर 1989 ते 2003 या कालावधीत सलग पाच वेळा त्यांनी लोकसभेत खासदारकी भूषवली आहे.
राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा असून 199 जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात बहुमताचा आकडा 101 आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पक्षासह विविध लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार मिळून तब्बल 2274 उमेदवार रिंगणात उभे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बीड
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)