एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरे यांच्या राज्यातल्या सहा सभांच्या तारखा जाहीर
राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात 8-10 सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या पक्षाने राज यांच्या सहा सभांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात 8-10 सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या पक्षाने राज यांच्या सहा सभांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाडा, असे आव्हान राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केले होते. राज ठाकरे निवडणूक काळात नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करणार असल्याचे बोलले जात होते. राज ठाकरे राज्यभर सभा घेऊन मोदींविरोधात प्रचार करणार आहेत.
पहिली सभा : 12 एप्रिल : नांदेड शहर
राज ठाकरे 12 एप्रिल रोजी नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत राज ठाकरे आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे आघाडीचे उमेदवार आहेत.
दुसरी सभा : 15 एप्रिल : सोलापूर
सोलापूरच्या कर्णिक नगर क्रीडांगणावर सायंकाळी 5.30 वाजचा राज ठाकरे यांची जाहीर सभा होईल. सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात आघाडीचे उमेदवार आहेत. राज ठाकरे या सभेत सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे.
तिसरी सभा : 16 एप्रिल : कोल्हापूर
कोल्हापूरमधील यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळच्या मैदानात संध्याकाळी 5.30 वाजता राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार आहेत.
चौथी सभा : 17 एप्रिल : सातारा
राज ठाकरे यांची चौथी सभा साताऱ्यात होणार आहे. साताऱ्यातील जुन्या राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर सायंकाळी 5.30 वाजता राज यांची सभा होईल. साताऱ्यात आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना यापूर्वीच मनसेने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे उदयनराजे यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात सभा घेणार आहेत.
पाचवी सभा : 18 एप्रिल : पुणे
राज ठाकरे यांची पाचवी सभा पुण्यातील सिंहगड रोडवरील शिंदे मैदानावर होणार आहे. या सभेत राज ठाकरे एकाच वेळी राष्ट्रवादीच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार या दोघांचाही प्रचार करतील अशी चर्चा सुरु आहे. राज ठाकरे पार्थ पवारांचा प्रचार करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले होते.
सहावी सभा : 19 एप्रिल : महाड, रायगड
राज ठाकरे रायगडच्या महाडमधील चांदे मैदानावर सहावी सभा घेणार आहेत. रायगडमध्ये सुनील तटकरे हे आघाडीचे उमेदवार आहेत.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement