Pune Municipal Election 2026: पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये ईव्हीएम बंद, मशीनवरील सिक्वेन्स चुकल्याचा उमेदवारांचा आक्षेप
Pune Municipal Election 2026: पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २६ या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे दोन ठिकाणी मशीन बंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Municipal Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज (दि. १५) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात (Pune Municipal Election 2026) ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने (Pune Municipal Election 2026) गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २६ या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे दोन ठिकाणी मशीन बंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Municipal Election 2026)
पुणे महापालिकेच्या एकूण १६५ जागांसाठी आज मतदान होत असून, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. कालच मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते. निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला. पुण्यातील महात्मा गांधी उर्दू शाळा गुरुवार पेठ प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणीही दोन ठिकाणी मशीन बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मशीनवरती असलेला सिक्वेन्स देखील चुकला असल्याचा उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. मशीनवरील सिक्वेन्स हा अ ब क ड नुसार नाही असा उमेदवारांचा आक्षेप आहे.(Pune Municipal Election 2026)
EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय - रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती पोस्ट शेअर करत संशय व्यक्त केला आहे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026
प्रभाग क्रमांक २६ मध्ये ६ मतदान केंद्रातील यंत्र बंद पडले. तासाभराच्या प्रयत्नानंतर मशीन सुरू, काही ठिकाणी यंत्र बदलले.
- स्वारगेट पोलिस लाईन,
- सेंट हिल्डाज स्कूल मधील दोन केंद्र
- सावित्रीबाई फुले स्मारक
- घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका
- महात्मा गांधी उर्दू शाळा
पुणेकरांचा कौल आज मत पेटीत! तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून येणार आहेत. पुण्यात चौरंगी लढत होणार आहे. महायुती मध्ये असणारे तिन्ही पक्ष वेगळेवेगळे लढत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान आहेतर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार: 1153
पुणे शहरातील एकूण मतदार: 35 लाख 52 हजार 637
पुरुष मतदार: 18 लाख 32 हजार 789
महिला मतदार: 17 लाख 13 हजार 360
शहरातील एकूण मतदार केंद्र: 4011
इतर मतदार: 488
बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या: 2




















