एक्स्प्लोर

मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Assembly Elections 2024 : बीएमसीचे माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना चोपडा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटातून उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.  बीएमसीचे माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी (Raju Tadvi) यांना चोपडा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटातून उमेदवारी मिळाली आहे. मात्र, राजू तडवी यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात तब्बल 31 वर्षे कार्यरत असलेल्या राजू तडवी यांच्याकडे सध्या शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे होती. काही दिवसांपूर्वीच तडवी यांनी मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच निवासस्थानी राजू तडवी यांना एबी फॉर्म दिला आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.  

नितीन दळवी यांनी केली तक्रार

राजू तडवी यांना चोपडा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी (Nitin Dalvi) यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्य सचिव, सचिव नगरविकास खाते व मुख्य निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

बीएमसी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 218 खासगी प्राथमिक शाळा या 2016 ते 2022 आरटीई मान्यता शिवाय सुरू होत्या. यावर शासनाला अहवाल पाठवणाऱ्या मुंबई उपसंचालकांनी पाठवलेल्या अहवालात या शाळा विना मान्यता चालल्याबाबत शिक्षणाधिकारी बीएमसीवर ठपका ठेवला आहे. या अहवालानुसार राजू तडवी यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा शुशीबेन शहा यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना दिला होता. पण आजतगायत तो अहवाल प्रलंबित आहे. वारंवार आयोगासोबत पाठपुरावा केल्यावर याबाबत माहिती मिळाली म्हणून नितीन दळवी यांनी राजू तडवी यांच्यावर कारवाई संपत नाही व ते दोषमुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी बीएमसी आयुक्तांना केली आहे. जर योग्य कारवाई नाही झाली तर प्रकरण मुख्य निवडणूक आयोग व त्यानंतर  न्यायालयात मांडले जाईल, असेही नितीन दळवी यांनी तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: मावळमध्ये शरद पवार गटाचा बंडखोर भेगडेंना पाठिंबा, बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार? एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मावळमध्ये शरद पवार गटाचा बंडखोर भेगडेंना पाठिंबा, बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार? एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Kolhapur Uttar Vidhan Sabha : उत्तरला 'राजेश' मिळताच कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर थेट विरोधाची 'लाट'! काळ फासून चव्हाण पॅटर्नचा उल्लेख
उत्तरला 'राजेश' मिळताच कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर थेट विरोधाची 'लाट'! काळ फासून चव्हाण पॅटर्नचा उल्लेख
Maharashtra Assembly Elections 2024 : भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत
भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत
Devendra Bhuyar : अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण
अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Bandra Railway Station : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटनाRadhakrishna Vikhe Patil : प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणीLadki Bahin Yojana Advertisement : जाहिरातीतून भाजपचा काँग्रेस आणि नाना पटोलेंवर निशाणाDelhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: मावळमध्ये शरद पवार गटाचा बंडखोर भेगडेंना पाठिंबा, बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार? एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मावळमध्ये शरद पवार गटाचा बंडखोर भेगडेंना पाठिंबा, बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार? एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Kolhapur Uttar Vidhan Sabha : उत्तरला 'राजेश' मिळताच कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर थेट विरोधाची 'लाट'! काळ फासून चव्हाण पॅटर्नचा उल्लेख
उत्तरला 'राजेश' मिळताच कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर थेट विरोधाची 'लाट'! काळ फासून चव्हाण पॅटर्नचा उल्लेख
Maharashtra Assembly Elections 2024 : भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत
भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत
Devendra Bhuyar : अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण
अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण
Dharmaveer 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर दणका उडवला, आता 'धर्मवीर 2' घरबसल्या पाहता येणार, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर झालाय रिलिज
बॉक्स ऑफिसवर दणका उडवला, आता 'धर्मवीर 2' घरबसल्या पाहता येणार, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर झालाय रिलिज
Anil Deshmukh: ...तर माझ्या जेवणाच्या ताटावर उंदीर-चिंचुंद्र्या तुटून पडायच्या, मी तुरुंगात कित्येकदा उपाशी झोपलोय: अनिल देशमुख
...तर माझ्या जेवणाच्या ताटावर उंदीर-चिंचुंद्र्या तुटून पडायच्या, मी तुरुंगात कित्येकदा उपाशी झोपलोय: अनिल देशमुख
मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात
मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात
Nimrat Kaur: अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते..'
अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते...'
Embed widget