Kolhapur Uttar Vidhan Sabha : उत्तरला 'राजेश' मिळताच कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर थेट विरोधाची 'लाट'! काळ फासून चव्हाण पॅटर्नचा उल्लेख
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा रंगली असतानाच राजेश लाटकर यांच्या रूपाने आमदार सतेज पाटील यांनी आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत अशा कोल्हापूर उत्तरची (Kolhapur Uttar Vidhan Sabha) विधानसभेची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) उत्सुकता अखेर शनिवारी संध्याकाळी संपली. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा रंगली असतानाच राजेश लाटकर यांच्या रूपाने कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाकडून सुद्धा राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरची लढाई राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी विरुद्ध होणार आहे.
काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवर काळ फासून 'चव्हाण पॅटर्न'चा उल्लेख
दरम्यान, राजेश लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याचे पडसाद थेट कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर उमटले. शनिवारी रात्री अज्ञातांनी काँग्रेस कार्यालयाच्या दरवाजावर दगडफेक केली. इतकेच नव्हे, तर काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवर काळ फासून 'चव्हाण पॅटर्न' उल्लेख केल्याने भूवया उंचावल्या. त्यामुळे हा प्रकार लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून झाला की राजकीय कुरघोडीचा प्रकार होता अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, दगडफेक झाल्याच्या समोर आल्यानंतर लगेच काँग्रेस कार्यालय परिसरातील लाईट बंद करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार कोणी केला याची सुद्धा चर्चा रगंली आहे.
कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा #MaharashtraAssembly #MaharashtraElection2024 #congress @satejp @parshrampatil12 https://t.co/KQq3fPl0rB
— ABP माझा (@abpmajhatv) October 26, 2024
महाविकास आघाडीत कोल्हापुरात काँग्रेसकडे पाच जागा
दरम्यान, जागा वाटपामध्ये सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बाजी मारताना (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पाच जागा काँग्रेसकडे खेचून आणल्या आहेत. शिरोळ मतदारसंघ सुद्धा त्यांनी आपल्याकडे खेचला आहे. त्याशिवाय कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार असणार आहे. जिल्हा काँग्रेसवर सतेज पाटील यांची एकहाती कमांड आहे. असे असतानाही थेट जिल्हा कार्यालयावर काळ फासून दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या