Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
हेही वाचा :
काँग्रेस पक्षाने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या या तिसऱ्या यादीत (Congress Candidate List) 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर काँग्रेसची बाजू हिरीरिने मांडणारे प्रवक्ते आणि निष्ठावंत सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या नावाचा समावेश आहे. सचिन सावंत यांना काँग्रेसने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून (Andheri West constituency) रिंगणात उतरवले आहे. यावर सचिन सावंत यांनी नाराजी दर्शवित मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे सचिन सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.