एक्स्प्लोर
तामिळनाडूत वेल्लोर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द
दुसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या (गुरुवार 18 एप्रिल 2019) वेल्लोरमध्ये मतदान होणार होतं. द्रमुकचे कोषाध्यक्ष दुरईमुरुगन यांचे पुत्र कठीर आनंद वेल्लोरमधून पहिल्यांदा निवडणूक लढवणार होते. द्रमुक विरोधात अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष न्यू जस्टिस पार्टीचे अध्यक्ष एसी शनमुगम उमेदवार होते.
नवी दिल्ली/चेन्नई : तामिळनाडूमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केली आहे. काही उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रपतींच्या सल्ल्याने निवडणूक आयोगाने वेल्लोरची निवडणूक रद्द केली, असा उल्लेख सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत आहे.
द्रमुक पक्षाच्या उमेदवाराच्या काही ठिकाण्यांवर छापेमारी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर वेल्लोरमधील परिस्थितीची पाहणी करुन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.
दुसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या (गुरुवार 18 एप्रिल 2019) वेल्लोरमध्ये मतदान होणार होतं. द्रमुकचे कोषाध्यक्ष दुरईमुरुगन यांचे पुत्र कठीर आनंद वेल्लोरमधून पहिल्यांदा निवडणूक लढवणार होते. द्रमुक विरोधात अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष न्यू जस्टिस पार्टीचे अध्यक्ष एसी शनमुगम उमेदवार होते.
पैशाच्या वापरामुळे लोकसभा निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्यामुळेच तीन वेळा निवडणूक रद्द करण्याची वेळ आली होती. 2016 मध्ये दोन मतदारसंघातील विधानसभा निवडणूक, तर एप्रिल 2017 मध्ये एका मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आमच्या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया द्रमुकने व्यक्त केली आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचा घणाघात द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी केला. सत्ताधारी अण्णाद्रमुकने मात्र निवडणूक रद्द करण्याऐवजी कठीर आनंद यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement