एक्स्प्लोर

Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, बारामतीत अजितदादांच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल, तर नागपूर, ठाणे, बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gram Panchayat Elections 2023 LIVE: राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी 2 हजार 369 ग्रामपंचायतीत मतदान, 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान

LIVE

Key Events
Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates Voting for 2369 gram panchayats and by elections of 130 Sarpanch vacancies Maharashtra Elections Know all details pune thane Raigad Baramati Nagpur Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, बारामतीत अजितदादांच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल, तर नागपूर, ठाणे, बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Gram Panchayat Elections 2023

Background

12:39 PM (IST)  •  05 Nov 2023

Wardha Gram Panchayat Elections 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला समुद्रपूर पोलिसांनी दोन कारवाईत केला दारुसाठा जप्त

Wardha Gram Panchayat Elections 2023 : मतदारांना आमिष दाखविण्याकरीता उमेदवार मोठ्या प्रमाणत दारूचा उपयोग करतात. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे उमेदवाराच्या आशा धुळीस मिळाल्याचे चित्र दिसत आहे. समुद्रपुर पोलिसांनी कारसह तब्बल दहा लाख रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराकडून दारूसाठा जप्त करीत त्याला अटक केली आहे.

पोलीस पेट्रोलिंग  दरम्यान जाम चौकमध्ये कारमध्ये दारुसाठा येत असल्याची माहिती मिळताच सदर कार चौकात तपासली. यात कारमध्ये 38 पेट्या देशी दारू आणि 3 पेटी विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी कार आणि दारूसाठ्यासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी कार चालक अजय हजारे यास ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे प्रशांत उर्फ बंडू आंबटकर, वैभव बारसकर आणि चंद्रपूर येथील मॉडर्न वाईन शॉप धारक यांना आरोपी करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या कारवाईमध्ये समुद्रपूर तालुक्यातील निभा येथे वाघेडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार असलेला विकी दिवाकर मसराम आणि त्याचा साथीदार शुभम हेमराज ठवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दुचाकीसह 88 हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे.

12:24 PM (IST)  •  05 Nov 2023

Beed Gram Panchayat Elections 2023 : बीड जिल्ह्यातील 186 पैकी 18 ग्रामपंचायतीमध्ये एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही

Beed Gram Panchayat Elections 2023 : बीड जिल्ह्यामध्ये आज 186 पैकी 158 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, या पैकी 18 ग्रामपंचायतीमध्ये एकही उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यामुळे आज या गावात सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय. खरंतर ग्रामपंचायतीची निवडणूक ही छोट्यातल्या छोट्या गावासाठी सुद्धा फार प्रतिष्ठेची असते आणि म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग बीड जिल्ह्यामध्ये दीडशेपेक्षा जास्त गावांमध्ये पाहायला मिळते. मात्र, ज्या गावांनी आरक्षण वेळेपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्या गावांमध्ये मात्र आज कुठेही गडबड गोंधळ पाहायला मिळाला नाही.

12:03 PM (IST)  •  05 Nov 2023

Latur Gram Panchayat Elections 2023 : लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक 13 ग्रामपंचायतीसाठी 292 उमेदवार रिंगणात उतरले

Latur Gram Panchayat Elections 2023 : लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका आज होत आहेत. त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. तसेच, सहा ग्रामपंचायतीत पोट निवडणूकही आजच आहे. यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केलेला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी 292 उमेदवार हे नशीब आजमावत आहेत. 13 सरपंच पदाच्या जागेसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत.

 

11:48 AM (IST)  •  05 Nov 2023

Wardha Gram Panchayat Elections 2023 : वर्ध्याच्या 29 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 13 टक्के मतदान

Wardha Gram Panchayat Elections 2023 : वर्ध्याच्या 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 13 टक्के मतदान झाले. 33 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 11. 20 टक्के मतदान पार पडले. 94 मतदान केंद्रावरून 22 हजार 850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सरपंच पदासाठी 77 तर सदस्य पदासाठी 417 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 

11:39 AM (IST)  •  05 Nov 2023

Dhule Gram Panchayat Elections 2023 : मतदाराच्या चिठ्ठीवर उमेदवाराचे चिन्ह असल्याने मांडळ येथे दोन गटात वाद

Dhule Gram Panchayat Elections 2023 : शिंदखेडा तालुक्यातील मांडळ या ठिकाणी दोन गटात वाद झाला. मतदाराच्या चिठ्ठीवर उमेदवाराचे चिन्ह असल्याने दुसऱ्या गटातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने दोन गट समोरासमोर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला असून शांततेत मतदान सुरू आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 20 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 20 March 2025TOP : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Embed widget