एक्स्प्लोर
युतीचे साईड इफेक्ट, नाणार प्रकल्प रद्द केल्याने प्रमोद जठार भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार
शिवसेनेच्या मनधरणीसाठी प्रस्तावित नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे तळकोकणातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतूनच प्रमोद जठार राजीनामा देणार आहेत.
![युतीचे साईड इफेक्ट, नाणार प्रकल्प रद्द केल्याने प्रमोद जठार भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार BJP ex Mla to submit resignation to CM today due to cancellation of Nanar refinery project युतीचे साईड इफेक्ट, नाणार प्रकल्प रद्द केल्याने प्रमोद जठार भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/23085439/Pramod-Jathar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
A
सिंधुदुर्ग/मुंबई : होय-नाही म्हणत शिवसेना आणि भाजपची युती झाली खरी, पण त्याचे साईड इफेक्ट्स आता पाहायला मिळत आहेत. कोकणातील प्रस्तावित नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द केल्यामुळे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार नाराज झाले आहेत. ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवणार आहेत.
युती धर्म पाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवसेनेच्या मनधरणीसाठी प्रस्तावित नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे तळकोकणातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतूनच प्रमोद जठार राजीनामा देणार आहेत.
"नाणारचा बळी जाणार असेल तर कोकणाला युती नको", भाजप नेते प्रमोद जठार यांची भूमिका
"नाणारचा बळी जाणार असेल तर कोकणाला युती नको," अशी भूमिका प्रमोद जठार यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. तसंच "जर नाणार रद्द झाला, तर निवडणूक लढवण्याशिवाय मला पर्याय उरणार नाही. मी जनतेसमोर जाण्यास तयार आहे, मी घाबरणारा नाही. पण युतीच्या शिल्पकारांनी ती वेळ आणून देऊ नये," असा इशाराही प्रमोद जठार यांनी दिला होता.
नाणार प्रकल्प रद्द
नाणार प्रकल्प रद्द करावा अशी अट युतीसाठी शिवसेनेने भाजपसमोर ठेवली होती. त्या अटीची पूर्तता करत अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीन दिवसांपूर्वी याची घोषणा केली. तसंच नाणार प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी स्थानिक नागरिकांना परत करण्यात येणार असल्याचंही जाहीर केलं. याशिवाय
जिथले नागरिक प्रकल्पाचं स्वागत करतील त्या ठिकाणी हा रिफायनरी प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली.
संबंधित बातम्या
नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित
नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)